Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘महाराष्ट्र भूषण 2021’साठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 29, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्य शासनाचा यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण २०२१’ हा पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमान असल्याचे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी काढले.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक अशा शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या pic.twitter.com/X2CN5LgrJz

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 29, 2021

यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री देशमुख यांनी यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुष्पगुच्छ, आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.

राज्य शासनाचा 2021 सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या घोषणेनंतर मंत्री देशमुख यांच्याशी साधलेल्या संवादावेळी आशा भोसले म्हणाल्या कि, आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांचे आभारी आहोत. पण महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार वेगळा आहे कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे.

Tags: Asha bhosaleMaharashtra Bhushan 2021Rahul RanadeSenior Singertwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group