Take a fresh look at your lifestyle.

अरे अरे हे काय केलं गोपी बहू?; देवोचा अंदाज पाहून नेटकऱ्यांचा झाला संताप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात प्रसिद्ध झालेली गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी टीव्ही मालिका जगतातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. या मालिकेतील तिची गोपी बहू ही भूमिका मालिकेनंतरही प्रेक्षकांच्या ध्यानी मणी रोवली आहे. त्यामुळे देवोलीनाला तिच्या खऱ्या नावापेक्षा जास्त आजही तिचे चाहते गोपी बहू म्हणूनच ओळखतात. देवोलीना गेल्या बिग बॉस १४ मध्ये स्पर्धक एजाज खान याची रिप्लेसमेंट म्हणून दिसली होती. देवो सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. विविध फोटो आणि व्हिडीओतून ती चाहत्यांचे मन जिंकत असते. साधीभोळी दिसणारी गोपी बहू खऱ्या आयुष्यात फार बोल्ड आणि धिंगाणा करणारी आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि चाहत्यांचा मात्र उद्रेक झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीनाने तिचा बेली डान्स करतानाचा एक डान्सिंग व्हिडीओ सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून त्यातील देवोचा अंदाज काहींना रुचला नाही आणि मग काय? गोपी बहू ट्रोल झाली ना. अनेकांनी या व्हिडीओचे निमित्त घेऊन देओल चांगलेच ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर या आधीही तिने बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवाह मिळवली होती. मात्र यावेळी उलटच झाले. खरतर व्हिडीओत दिसणारा तिचा बोल्ड अंदाज कुणाचसाठी नवीन नाही. पण तरीही निमित्त मात्र होऊन ट्रोलिंगला जोर आला आहे. याआधीही ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल झाली होती आणि म्हणूनच तिला ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही.

देवोलिना भट्टाचार्जी अशी अभिनेत्री आहे जिला कधीच साचेबद्ध कामात अडकून काहीतरी रोज रोजसारखं करायचं नव्हतं. देवोलीनाला आता जुन्या पुराण्या संस्कारी अश्या कुठल्याही भूमिकांपेक्षा हटके काही तरी करण्याची ईच्छा आहे. त्यामुळे काही तरी वेगळेपण असेल तरच ती समोरून आलेल्या भूमिका स्वीकारते आणि निभावते. सोशल मीडियावर देवोलीना अतिशय लोकप्रिय आहे. तिचे फॅनफॉलोईंग देखील जबरदस्त आहे. इंस्टाग्रामवर तिचे २.२ मिलियनपेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत.