Take a fresh look at your lifestyle.

‘शाबास मिथू!’ मधून तापसी साकारणार ‘कप्तान मिथाली राज’

0

मुंबई । भारतीय महिला क्रिकेटची कप्तान मिथाली राज हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल तापसी पन्नूने जाहीर केलं कि ती ‘शाबास मिथू!’ नावाच्या बायोपिकमध्ये ती मिथाली राजची भूमिका वठवणार आहे. स्ट्रेट ड्राइव्ह शिकण्यासाठी मी तयार असल्याचं तिनं आपल्या इन्स्टा पोस्टद्वारे सांगितलं. चित्रपटात मिथाली राजची क्रिकेट विश्वातली इन्स्पायरिंग इंनिंग दाखवली जाईल.

एकता कपूर तिच्या ऑल्ट बालाजी फिल्म्स द्वारे चित्रपटाची निर्मिती करणार आहे. महिला क्रिकेटरवर बॉलीवूड मध्ये प्रोड्युस होणार हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी पुरुष क्रिकेटर्स धोनी, सचिन आणि अझरुद्दीन यांच्यावर बायोपिक आले आहेत. रणवीर सिंगही कपिल देव यांच्यावरील चित्रपटात काम करत आहे.

तापसीने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून मिथालीसोबतचा बड्डे सिलेब्रेट करतानाचा फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली. ती तिच्या पोस्ट मध्ये म्हणते, ” मिथाली तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तूझा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे, तुझा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी माझी निवड झाल्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजते. मी या प्रोजेक्टसाठी खूप उत्साही आहे. मी तुझ्या काय गिफ्ट देऊ शकेन मला माहिती नाही, पण तुला स्वतःला मोठ्या पडद्यावर बघितल्यावर अभिमान वाटेल याची जबादारी मी घेते. मी स्ट्रेट ड्राइव्ह शिकण्यासाठी पूर्ण तयार आहे. #ShabaashMithu

Leave A Reply

Your email address will not be published.