Take a fresh look at your lifestyle.

शाहरुख खानच्या ‘नाईट रायडर्स’ संघाचा आता अमेरिकेतही डंका ; USA क्रिकेट लीग मध्ये घेतला सहभाग

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आता अमेरिकेतही आपलं नाव कमवणार आहे. परंतु चित्रपटातुन नव्हे तर क्रिकेट मधून. ..अमेरिकेत आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या टी-२० स्पर्धेसाठी शाहरुखने लॉस एंजलिस संघाची मालकी स्विकारली आहे. शाहरुखने आपल्या संघाचं नाव LA Knight Riders असं ठेवलं आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत. मुंबई मिररने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

याआधी शाहरुख आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत त्रिंबागो नाईट रायडर्स संघाचा मालक आहे. अमेरिकेत येत्या काळात ही टी-२० स्पर्धा भरवली जाणार असून या स्पर्धेत न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को, वॉशिंग्टन डी.सी, शिकागो, डल्लास आणि लॉस एंजलिस असे सहा संघ सहभागी होणार आहेत. अमेरिकेत टी-२० क्रिकेटचं आयोजन करणाऱ्या American Cricket Enterprise या कंपनीमध्ये शाहरुख खानच्या फर्मची भागीदारी आहे. 

मुंबई मिरलला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही Knight Riders हा ब्रँड जगभरात प्रमोट करण्याचा प्रयत्न करत आहोत. याच प्रयत्नातून अमेरिकन टी-२० क्रिकेटमध्ये आपण संघ विकत घेतल्याचं शाहरुखने सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.