Take a fresh look at your lifestyle.

लेकाच्या भेटीसाठी व्याकुळ शाहरुख पोहोचला आर्थर रोड तुरुंगात; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ३ ऑक्टोबर २०२१ रोजी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि त्याचे सोबती याना अटक करण्यात आली. तेव्हापासून यांच्या जमिनीच्या याचिका कोर्टात दाखल होत आहेत आणि नाकारल्या जात आहेत. जाणून हा एक सिलसिला सुरु आहे. हे प्रकरण जितके संपेल असे वाटते तितके आणखीच गुंतताना दिसत आहे. दरम्यान ८ ऑक्टोबरपासून आर्यन मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून, ती २१ ऑक्टोबरला संपणार आहे. त्याचे झाले असे कि, तपासादरम्यान NCBच्या हाती आर्यनचे व्हॉट्सअप चॅट लागले आहे, ज्यात ड्रग्जबाबत त्याने एका नवोदित अभिनेत्रीशी चर्चा केली आहे. हे पुरावे १४ ऑक्टोबरला पुरावा न्यायालयासमोर हजार केले असता आर्यनच्या अडचणी वाढल्या होत्या. आता तुरुंगात असलेल्या आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख आर्थर रोड कारावासात पोहोचल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचे ड्रग्जशी असलेले स्ट्रॉंग कनेक्शन हळूहळू उलघडत असताना शाहरुखचा मुलगा यात अश्या पद्धतीने सापडेल यावर बॉलिवूडकरांना काही विश्वास बसत नसला तरीही हेच सत्य आहे. दरम्यान आर्यन खान याचा जामीन अर्ज पाचव्यांदा सत्र न्यायालयाने काल फेटाळला आणि पुन्हा एकदा आर्यनची पाठवणी तुरुंगात झाली. NCB कडून दाखल केलेले पुरावे योग्य असल्याचे सांगून न्यायालयाने आर्यन आणि त्याचे सोबती यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे आणि यानंतर आता आर्यन खानच्या वकिलांनी या निर्णयाला विरोध दर्शवित मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणावर आज सुनावणीची शक्यता आहे. पण त्याआधीच मुलाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेला शाहरूख खान गुरूवारी सकाळी आर्थर रोड कारागृहात पोहचला.

लेकाचे हालहवाल पाहण्यासाठी पोहोचलेला शाहरुख माध्यमांना टाळताना दिसला मात्र कॅमेऱ्याच्या नजरेतून त्याची सुटका झाली नाही. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल देखील होताना दिसत आहे. आर्यन खानला जामीन मिळेल अशी आशा असताना त्याचे समोर आलेले व्हॉट्सअँप चॅट त्याच्या जामिनातील मुख्य अडचण मानण्यात येत आहे. आर्यनला या ड्रग्ज प्रकरणाची पूर्ण माहिती होती. त्याने ड्रग्ज बाळगले नसले तरी अरबाज मर्चंटकडे ६ ग्रॅम चरस सापडले आहे. अरबाजकडे ड्रग्ज असल्याची माहिती आर्यनला होती. आर्यन आणि अरबाज हे मित्र असून, हो दोघेही एकत्र क्रूझवर आले होते. व्यक्तिगत आनंदासाठी ड्रग्ज सोबत आणल्याची कबुली या दोघांनीही दिली आहे. असे NCB कडून स्पष्ट करण्यात आले आहे.