Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वैष्णोदेवीच्या दरबारात शाहरुख खानची हजेरी; उमराहनंतर हिंदू धार्मिक स्थळी टेकला माथा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 12, 2022
in Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
SRK
0
SHARES
115
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान गेल्या वर्षभरात अनेकदा विविध गोष्टींमुळे चर्चेत राहिला आहे. कधी आलिशान घर आणि घराची डायमंड नेमप्लेट, तर कधी लेकाचं ड्रग्ज प्रकरण, याशिवाय वाढदिवसाला झालेली चाहत्यांची गर्दी अशा अनेक कारणांमुळे किंग खान चर्चेत राहिला. शाहरुख मोठ्या गॅपनंतर आता नव्या ३ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘डंकी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सौदीत असताना तो उमराहसाठी मुस्लिम धार्मिक स्थळी मक्का येथे गेला होता. दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता शाहरुखने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे आणि हा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. अलीकडेच आमिर खानसुद्धा पूजा करताना दिसला होता. यावर नेटकऱ्यांनी यांचे चित्रपट चालत नाहीत म्हणून ड्रामा सुरु केला आहे असे म्हटले आहे.

Shah Rukh Khan reached Maa Vaishno Devi Temple to seek blessings 🤍#ShahRukhKhan𓀠 pic.twitter.com/M8OZpmlvz0

— Troll SRK Haters (@trollsrkhaters5) December 12, 2022

मक्का येथे शाहरुखने उमराह प्रार्थनेसाठी हजेरी लावल्याचे समोर आले होते. त्याचा या दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता शाहरुख खान चक्क हिंदु धार्मिक स्थळी वैष्णोदेवीच्या दरबारात पोहोचला. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खानने काळे कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. एव्हढ्या गजबजलेल्या ठिकाणी शाहरुखला पाहून सुरक्षा यंत्रणेवर कोणताही दबाव येऊ नये आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून त्याने चेहरा लपवून डोळ्यांवर चष्मा लावल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ रविवारी रात्री उशिराचा असल्याचेहि बोलले जात आहे. या दरम्यान, शाहरुखने वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे.

King #ShahRukhKhan never fails to win our hearts.

Earlier this month #SRK performed Umrah in Makkah Sharif and last night King Khan visited Mata Vaishnodevi Temple in Jammu to take blessings.

We all should respect every beliefs.@iamsrk

Thank you King Khan ❣️ pic.twitter.com/LREYSo7KPw

— Team Shah Rukh Khan Fan Club (@teamsrkfc) December 12, 2022

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत शाहरुखसाठी काही जण रस्ता मोकळा करून देत असल्याचे दिसत आहे. यामध्ये त्याच्यासह एक जॅकेट घातलेली व्यक्ती दिसतेय. चाहत्यांच्या मते हा शाहरुख खानच आहे. मात्र या व्हिडीओत अभिनेत्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळे पक्के सांगणे मुश्किल आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला शाहरुख खान त्याच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सौदी अरेबियात होता आणि तिथले शेड्यूल पूर्ण केल्यानंतर त्याने सोशल मीडियावर आभार व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली होती. या दरम्यान अनेक चाहत्यांनी मक्का येथे नक्की जा असे म्हटल्याने कदाचित तो मक्का या पवित्र शहरात उमराह करताना दिसला होता. उमराहसाठी पोहोचलेल्या शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यामध्ये तो स्पष्ट दिसत होता.

Tags: Bollywood CelebrityShahrukh KhanTwitter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group