शाहरुख खानची चिंता अद्याप कायम; जेलमधून परतल्यानंतर अबोल झाला आर्यन
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जवळपास महिनाभर तुरुंगात होता. यानंतर २५ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खानसाठी तुरुंगातील अनुभव अत्यंत धक्कादायक होता. आपल्या विशिष्ट कोषातून बाहेर पडून तुरुंगातील कैदीपण भोगणारा आर्यन अजूनही सावरण्यासाठी वेळ घेतोय. शाहरुख खानच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीय लोकांनी आर्यन खानला भेटल्यानंतर त्याच्या स्थितीबाबत बोलताना सांगितले कि, तुरुंगातून परतल्यानंतर आर्यन अजूनही ‘शॉक’मध्ये आहे. इतकेच नव्हे तर तो फार अबोल झाला आहे. तो फार कुणाशी बोलत नाही.
सूत्रानुसार, तुरुंगातून परतल्यानंतर आर्यन पूर्णपणे शांत झाला असून आता तो एकलकोंडा झाला आहे. इतकेच नव्हे तर आर्यन आधीइतका ऍक्टिव्ह राहिलेला नाही आणि तो कोणाशीही जास्त बोलत नाही. शक्य तितका एकटा राहतो. आर्यन बहुतेकवेळा त्याच्या खोलीतच असतो. त्याला बाहेर जाऊन मित्रांना भेटण्यात आधीइतका आता रस राहिलेला नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार आर्यन आधीपासूनच खूप शांत होता. पण जेलमधून परतल्यानंतर तो पूर्णपणे शांत आणि एकटा एकटा राहणे पसंत करू लागला आहे.
अलीकडे अशी बातमी समोर आली होती की, शाहरुख आणि गौरी खान आपला मुलगा आर्यन खानच्या सुरक्षेबद्दल चिंतेत आहेत. यामुळे त्याची सुरक्षा वाढवणार आहेत. पण कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी या गोष्टीला स्पष्टपणे नाकारलं आहे. त्यांनी सांगितलं की, आर्यनसाठी खास बॉडीगार्ड ठेवण्याची अजून कोणतीही योजना नाही. सध्या शाहरुख आर्यनसोबत अधिकाधिक वेळ घालवतोय. त्याने अद्याप त्याच्या चित्रपटांचं शूटिंगसुद्धा सुरू केलेलं नाही. सध्या आर्यन खानसह, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा हे जामिनावर बाहेर असून हा जमीन न्यायालयाच्या अटींच्या चौकटीत देण्यात आलेला आहे.