Take a fresh look at your lifestyle.

गणपती विसर्जनाचा फोटो शेअर करत शाहरुख खानने चाहत्यांना दिला ‘खास’ संदेश

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | कोरोनामुळे यावर्षी सगळीकडे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शनिवारी गणरायाचे मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झाले. सामान्यांपासून राजकीय नेते, उद्योगपती ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी गणेश मूर्तीचं स्वागत केलं होतं.

काही ठिकाणी दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर गणपती विसर्जन करण्यात आले. बॉलीवूड चा किंग खान शाहरुखच्या ‘मन्नत’ या निवासस्थानी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो.शाहरुखनेही दीड दिवसाच्या गणपतीच विसर्जन केले.मनोभावे पूजा केल्यानंतर शाहरुखने घरच्या गणपतीचं विसर्जन केलं. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला.

या फोटो मध्ये शाहरुख खान ब्लॅक अँड व्हाइट सेल्फीत पाहायला मिळत आहे. हा सेल्फी पोस्ट करत शाहरुखने लिहिलं, ‘पूजा आणि विसर्जन पार पडलं. गणपती बाप्पा तुमच्यावर आणि तुमच्या आप्तेष्टांवर, कुटुंबीयांवर आनंद आणि आशीवार्दांचा वर्षाव करो. गणपती बाप्पा मोरया!’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’