Take a fresh look at your lifestyle.

शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण; गौतम गंभीर म्हणतो…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी संघाचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून आफ्रिदीनी याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसापासून भारताविरोधातील विधानांमुळे शाहिद आफ्रिदी चर्चेत आहेत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आता शाहिद आफ्रिदीना कोरोना झाल्याचे समजता त्यांनी आफ्रिदी यांनी लवकरात लवकर बरे व्हावे असे म्हंटले आहे.

आपल्या ट्विटर अकॉउंटवरून आफ्रिदी यांनी ‘मला गुरुवारपासून बरे वाटत नव्हते, माझे अंग खूप दुखत होते, दुर्दैवाने माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. लवकर बरे होण्यासाठी तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.’ असे ट्विट केले आहे. यावर गौतम गंभीर यांनी आफ्रिदीनी लवकरात लवकर बरे व्हावे, असे म्हंटले आहे. तसेच “कोणालाही या विषाणूची लागण होऊ नये अशी माझी इच्छा आहे. माझ्यात आणि आफ्रिदीमध्ये अनेक राजकीय मतभेद असले तरीही त्याने यामधून लवकरात लवकर बरं व्हावं असं मला वाटतंय. आफ्रिदीपेक्षाही माझ्या देशातील प्रत्येक करोनाबाधित रुग्णाने यामधून बरं व्हावं अशी माझी इच्छा आहे.” असेही गंभीर म्हणाले.

 

या दोन्ही खेळाडूंमध्ये अनेकदा सोशल मीडियावर शाब्दिक द्वंद्व सुरु असतं. मात्र आफ्रिदीला करोनाची लागण झाल्यानंतर गंभीरने त्याने यामधून लवकरात लवकर बरं व्हावं असं म्हटलंय. गंभीर ‘सलाम क्रिकेट २०२०’ या कार्यक्रमात बोलत होता. दरम्यान, पाकिस्तानमध्ये करोनाचे एक लाख ३२ हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत तेथे अडीच हजारहून अधिक जणांना करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ५० हजार पाकिस्तानी नागरिक करोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.