Take a fresh look at your lifestyle.

शाहिद कपूर पुरस्कार न दिल्यानं ‘भडकला’ !

0

चंदेरी दुनिया । बॉलिवूड स्टार शाहिद कपूरच्या कबीर सिंग या सिनेमानं यावर्षी 280 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सिनेमातील शाहिदच्या अ‍ॅक्टींगचंही खूप कौतुक झालं. त्याच्या करिअरमधील हा बेस्ट परफॉर्मंस असल्याचंही काहींनी म्हटलं. या सिनेमासाठी शाहिदला एका पुरस्कार सोहळ्यात बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळणार होता. ऐनवेळी मात्र कार्यक्रमाच्या वेळापत्रकात फेरफार करत शाहिदला पुरस्कार दिलाच नाही. यामुळे शाहिदच्या रागाचा पारा चढला. शाहिद आपलं सादरीकरण न करताच कार्यक्रमातून बाहेर पडला.

एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, नुकताच एक पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात त्याला बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळणार होता. आयोजकांनी त्याला तसं सांगितलंही होतं. यात तो डान्सही करणार होता. ऐनवेळी आयोजकांकडून यात बदल करण्यात आला आणि तो पुरस्कार मात्र अभिनेता रणवीर सिंगला देण्यात आला. हे पाहून शाहिद प्रचंड संतापला. शाहिदनं पुरस्कार सोहळ्यातून ताबडतोब एक्झिट घेतली.

खास बात म्हणजे या पुरस्कार सोहळ्याचं शुटींगही पार पडलं आहे. लवकरच चाहत्यांना हे शुटींग टेलीव्हीजनवर पाहायला मिळणार आहे. परंतु शाहिदच्या सादरीकरणाचं काय याबाबत वाहिनी काहीच ठरवलं नाही असं दिसत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: