Take a fresh look at your lifestyle.

शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ; चित्रपटाची जोरदार चर्चा

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड मध्ये आत्तापर्यंत अनेक महान व्यक्तींवर आधारित चित्रपट आले आहेत. दरम्यान जयललिता आणि इंदिरा गांधी यांच्या नंतर आता आणखी एक चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शाहिद कपूर (Shahid Kapoor)  दिसण्याची शक्यता आहे.

कबीर सिंह’ चित्रपटाचे निर्माते अश्विन वर्दे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे काम सुरु करणार आहेत. यासाठी त्यांनी साउथ चित्रपटसृष्टीतील लायका प्रोडक्शन या बड्या कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. तर चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी शाहिदला विचारणा करण्यात आलीय. शाहिदने यासाठी होकार देखील दिल्याचे कळते आहे.

सध्या, चित्रपटाशी संबंधित काही व्यवहार पूर्ण केले जात आहेत. ‘पद्मावत’ या चित्रपटानंतर शाहिदच्या हा दुसरा ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. यापूर्वी अभिनेता शरद केळकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ मध्ये शरदने साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave A Reply

Your email address will not be published.