Take a fresh look at your lifestyle.

शाहीर नंदेश उमप म्हणाले; कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी राज्य सरकारने घ्यावी लोककलावंतांची मदत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षभरापासून कोरोनाने नुसता थैमान घातला आहे. परिस्थिती नियंत्रणात येशील अशी आशा दिसत दिसत पुन्हा कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढू लागला आहे. या कारणास्तव सध्या राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक कार्यक्रमांवर देखील बंदी असल्यामुळे लोककलावंतांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे हृदयद्रावक दृश्य सामोरी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शाहीर नंदेश उमप यांनी माय महानगरसोबत संवाद साधताना कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने लोककलावंतांची मदत घ्यावी, अशी मागणी केली आहे.

आपण सारेच जाणतो की, सध्या देशासह राज्यभरात कोरोना नामक विषाणूने कहर माजवला आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरात कदम नियमावली लागू करण्यात आली. परिणामी अनेक कार्यक्रम, चित्रीकरण आणि अन्य जमाव होईल अश्या सर्व बाबी विशेषतः रोखण्यात आले आहेत. सद्य परिस्थितीमुळे कलाकारांना काम नसल्याने महाराष्ट्रातील विशेष करून ग्रामीण भागातील कलावंतांचे हाल होत आहेत. आपल्या कलेतून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हे कलावंत नेहमीच करत असतात. कोरोनाच्या काळात अश्याच प्रकारे जनजागृती करण्याचे काम शासनाने लोककलावंतांकडे द्यावे. तसेच या कामासाठी त्यांना योग्य असे मानधन द्यावे, असे शाहीर नंदेश उमप म्हणाले.

 

शाहीर नंदेश उमप हे शाहीर घराण्याचा वारसा जबाबदारीनीशी पुढे चालवीत आहेत. अनेको कलावंतांना सोबत घेऊन त्यांनी महाराष्ट्रात लोककला जिवंत ठेवण्याचा विडा उचलला आहे. ते नेहमीच लोककलेविषयी आणि कलावंतांविषयी आदराची भावना ठेवतात. या कोरोनाच्या काळातील भीषण परिस्थितीत पोळला जाणारा कलावंत हा आपला आहे, हे मानून त्यांनी राज्य सरकारकडे अशी मागणी केली आहे. तसेच आकाशवाणी, दूरदर्शन, सोशल मीडिया अशा विविध ठिकाणी या कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करावा. जेणेकरून कलाही जपली जाईल आणि समाजप्रबोधन देखील होईल, असे शाहीर नंदेश उमप म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.