Take a fresh look at your lifestyle.

‘डब्बू रत्नानी’च्या कॅलेंडर फोटोशूटमध्ये झळकणार पंजाबची कॅटरिना; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस १३’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री शहनाज गिल सध्या प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर सर करू लागली आहे. याहीपेक्षा महत्वाची बाब अशी कि, शहनाज सध्या खूपच आनंदी आहे. कारण, सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीने तिचे नुकतेच फोटोशूट केले आहे आणि हे फोटोसेशन चांगलेच गाजताना दिसतेय. या फोटोशूटचा एक बीटीएस अर्थात बिहाइंड द सीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत शहनाजचा ग्लॅमरस अंदाज कातिलाना आहे. ती पोज देतेय आणि डब्बू फोटो क्लिक करतोय. वाह.. व्हॉट अ कॉम्बिनेशन..

पहिली गोष्ट म्हणजे या व्हिडिओत शहनाज खूपच भारी आणि मोहक दिसतेय. त्यामुळे पक्का भल्याभल्यांची विकेट पडली असणार. यात काहीच वाद नाही. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि कलरफुल पँटमध्ये शहनाज अजब सुंदर दिसतेय. त्यामुळे हा व्हिडीओ समोर येताच तिचे चाहते आ वासून तिचे फोटो पाहायला उत्सुक आहेत. प्रसिद्ध सेलेब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये छायाचित्र किमयागारच. त्यामुळे डब्बू जेव्हा स्वतः शहनाजचे फोटोशूट करू लागले तेव्हा निश्चितच शहनाजचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे

‘बिग बॉस १३’ मूळे प्रकाश झोतात आलेली शहनाज ‘पंजाबची कॅटरिना कैफ’ म्हणून ओळखली जाऊ लागली आणि मग काय तिने भल्याभल्यांना वेड लावले. बिग बॉसच्या घरातील सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाजची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. अलीकडेच तिने एक व्हिडीओ शेअर करीत सिद्धार्थच्या ‘ब्रोकन बट ब्युटिफुल ३’चे प्रमोशन केले होते. यानंतर सिद्धार्थ व शहनाज अनेक दिवस चांगलेच ट्रेंडमध्ये होते. यामुळे अगदी काही दिवसांतच शहनाजची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ‘शहनाज गिल की शादी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. अर्थात हा शो लोकांना फार आवडला नव्हता.