Take a fresh look at your lifestyle.

तुमचा सर्वांत जवळचा मित्र कोण? शाहरुख खानने दिले ‘हे’ उत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेता किंग खान हा नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. कधी फेसबुक फॅन पेज तर कधी ट्विटर वरून तो चाहत्यांशी संपर्क साधत असतो. एका सेशन दरम्यान एका चाहत्याने त्यास जवळच्या मित्रांबाबत प्रश्न विचारला. आपल्या चाहत्यास नाराज न करता त्याने उत्तर देत आपल्या जवळचा मित्र कोण याचा खुलासा केला आहे.

बराच काळ चित्रपटांपासून दूर असलेला शाहरुख लवकरच त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. “पठाण” या चित्रपटातून शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. त्याचे ट्विटरवर नुकतेच #AskSRK हे सेशन पार पडले आहे. या सेशनमध्ये त्याने चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. कित्येकांनी कित्येक वेगवेगळ्या विषयाचे प्रश्न विचारले. त्यातील एका प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने आपल्या जवळच्या मित्रांबद्दल माहिती दिली.

“कॉफी विथ करण” या शोमधील एका विधानाची आठवण करून देत, एका चाहत्याने शाहरुखला त्याचे जवळचे मित्र कोण? अशी विचारणा केली. या चाहत्याने लिहिलं, ‘सर तुम्ही ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये एकदा म्हटलं होतं की, तुमचा कोणीच जवळचा मित्र नाही कारण, मैत्री सांभाळणं तुम्हाला जमत नाही. तर आताही तुम्हाला असंच वाटतं का?’

दरम्यान या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये “नाही, आता माझी मुले माझी चांगली मित्र आहेत”, असे त्याने म्हटले आहे. बॉलीवूडचा किंग खान कामात कितीही व्यग्र असला तरी नेहमीच आपल्या कुटुंबासाठी तो वेळ काढत असतो. या सेशनमध्ये जवळ जवळ १५ पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे त्याने दिली.

त्यानंतर चाहत्यांचा निरोप घेताना , ‘आता मला गेलं पाहिजे, नाहीतर लोकांना वाटेल की मला काहीच काम नाही आहे. तुम्ही सर्वांनी मला दिलेल्या तुमच्या वेळासाठी धन्यवाद. ज्यांना मी उत्तर देऊ शकलो नाही त्यांनी निराश होऊ नका. अनेकांना मी स्वार्थी आहे असं वाटू शकतं पण असं नाही आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.’ असे लिहून हे सेशन संपविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.