Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान’च्या घरी बाप्पाचे आगमन; ट्विटरवर शेअर केला फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 31, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
SRK
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपासून राज्यात एकच जयघोष ऐकू येणार आणि तो म्हणजे.. ‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!’ पुढचे १० दिवस संपूर्ण राज्यात नुसता आनंदी आनंद असणार आहे. कारण तब्बल २ वर्षांनंतर ना नियम ना अटी असा जंगी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन झाले आहे. मुख्य म्हणजे फक्त मराठी कलाकारांच्या नव्हे तर बॉलिवूड कलाकारांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या घरी गणेश मूर्तीची विधीवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रसंगाचा फोटो शाहरुखने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे.

Ganpatiji welcomed home by lil one and me….the modaks after were delicious…the learning is, through hard work, perseverance & faith in God, u can live your dreams. Happy Ganesh Chaturthi to all. pic.twitter.com/mnilEIA1tu

— Shah Rukh Khan (@iamsrk) August 31, 2022

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले दिसून येत आहे. शिवाय यामध्ये गणेशमूर्तीदेखील दिसत आहे. शाहरुख खानने हे ट्विट करीत लिहिले आहे कि, ‘मी आणि लहानग्याने (अबराम) गणपतीजींचे घरी स्वागत केले. त्यानंतर मोदकांचा आस्वाद घेतला. यातून एक शिकवण मिळते. ती अशी की, मेहनत, चिकाटी आणि देवावर श्रद्धा असेल तर तुम्ही तुमची स्वप्न पुर्ण करु शकता. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

अभिनेता शाहरुख खानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये बाप्पासोबत त्याची आणि मुलाची एक छोटीशी झलक दिसत आहे. शाहरुख खान अशा बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्याच्या घरी दरवर्षी बाप्पा विराजमान होतो. त्यामुळे यंदाही त्याने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या घरी बाप्पाचे जंगी स्वागत केले आहे. शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो त्याच्या आगामी ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन बिग बजेट चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बऱ्याच काळापासून तो कार्यरत नव्हता मात्र आता एकाच वर्षात तो दोन चित्रपट घेऊन येतो आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: Ganeshotsav 2022Shahrukh KhanTwitter PostViral Photoviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group