Take a fresh look at your lifestyle.

तब्बल दोन वर्षांनंतर ‘या’ चित्रपटातून शाहरुख खान करणार वापसी??

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख बऱ्याच दिवसापासून चित्रपटात दिसला नाही . शाहरुख खान २०१८ मध्ये ‘झीरो’ हा चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. तेव्हा शाहरुखचा जवळचा मित्र,दिग्दर्शक करण जोहरने शाहरुख स्वत:ला वेळ देत आहे असे म्हटले होते. त्यामुळे शाहरुख पुन्हा चित्रपटात कधी दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मात्र दोन वर्षाच्या ब्रेकनंतर शाहरुख पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत.

यश राज फिल्म 50 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ‘पठान’ हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची देखील चर्चा आहे. शाहरुखने या चित्रपटासाठी होकार दिला असून पुढच्या महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान,गेल्या काही वर्षात शाहरुख खानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. त्यामुळे दोन वर्षांच्या ब्रेक नंतर आता शाहरुख पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत नक्कीच उत्सुकता वाढली आहे.

Comments are closed.