Take a fresh look at your lifestyle.

शाहरुख खानची मुलगी ‘सुहाना’ अडकली अमेरिकेत

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । शाहरूख खानची लेक सुहाना खान इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहाना खानचे फोटो, तिचे व्हिडीओ कायम चर्चेत असतात. मात्र आता कोरोना व्हायरसमुळे सुहाना अमेरिकेत अडकून पडली आहे. ती तिथे घरात बंद आहे. त्यामुळे तिचे डोळे पाणावले आहेत.

जगभर थैमान घालणा-या कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे. शाहरूखची 19 वर्षांची लेक सुहाना अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकतेय. सुहानालाही कोरोनाच्या धास्तीमुळे घरात कोंडून घ्यावे लागतेय.

 सुहानाने नुकतेच इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो शेअर केलेत. यात ती फुल मेकअपमध्ये दिसतेय. ओठांवर लाल लिपस्टिक, डोळ्यांत काजळ, स्टाईलिश केस. तिला पाहून बाहेर जाण्यासाठी ती रेडी झाली असावी असे वाटतेय. पण कदाचित कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे तिला घरातून बाहेर पडता आले नाही. सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.  नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले अकाउंट प्रायव्हेट अकाउंट पब्लिक केले आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: