Take a fresh look at your lifestyle.

गौरी खान आणि आर्यन न्यूयॉर्कला रवाना; देशाबाहेर हाकला यांना म्हणत नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोना नामक विषाणूने थैमान घातला आहे. यामुळे कित्येक निष्पाप आपला जीव गमावत आहेत. शासनाने ह्या विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमांची आखणी करून दिली आहे. असे असताना शाहरूख खानची पत्नी गौरी खान व मुलगा आर्यन खान हे नुकतेच न्यू यॉर्कसाठी रवाना झाले आहेत. यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. देशातील परिस्थिती गंभीर असताना सेलिब्रिटींनी लोकांना घरात राहा असे शहाणपणाचे धडे देत स्वतः देशाबाहेर पळ काढणे योग्य नाही. यामुळेच गौरी आणि आर्यनचा व्हिडीओ पाहताच नेटकाऱ्यानी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

हे सेलिब्रिटी केवळ नावाचे भारतीय आहेत. देशावर कोणतेही संकट आले की, लगेच पळ काढतात, असे एका युजरने लिहिले आहे. अन्य एका युजरनेही अशीच कमेंट केली. भारतात स्थिती बिघडली की, लगेच विदेशात पळून जा. पैसा इथे कमवा आणि इथल्या लोकांना गरज असेल तेव्हा पळ काढा, अशी कमेंट आहे. तर निकालो इनको इंडिया से, अशी प्रतिक्रियाही एका युजरने दिली. भागो सबके सब, पब्लिक सब याद रखेगी, एक न एक दिन तो आओगे वापस, असे एकाने लिहिले. लॉकडाऊनच्या काळात या सेलिब्रिटींना घराबाहेर कसे पडता येते? आम्ही घरात बसायचे, सर्व प्रोटोकॉल पाळायचे आणि यांनी बाहेर देशात फिरायचे, असे का? असा सवाल अनेक युजर्सनी केला.

               Comments

कोरोना महामारीच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी भारताबाहेर पळ काढला आहे. काही सुट्टीच्या नावाखाली मालदीवमध्ये आहेत. तर काही अन्य देशांत. अलीकडे आलिया व रणबीर कपूरदेखील मालदीवला व्हॅकेशनसाठी रवाना झाले होते. तर सारा अली खान, जान्हवी कपूर, दिशा पटनी, टायगर श्रॉफ आणि अन्य हे सर्व सेलिब्रिटी व्हॅकेशनच्या नावावर देशाबाहेर आहेत. इतकेच नव्हे तर आपले फोटो आणि व्हिडीओ देखील हे शेअर करीत आहेत. नुकतेच अभिनेत्री श्रुती हसन आणि प्रसिद्ध लेखिका शो डे यांनी या सेलिब्रिटींची चालीचं कानउघाडणी केली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील हे प्रसिद्ध कलाकार लोकांना मास्क लावा, सोशल डिस्टंसिन्ग पाळा आणि घरी राहा, सुरक्षित राहा असे सल्ले देत आहेत. मात्र स्वतःच शासनाच्या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. परिणामी या साऱ्यांनाच चाहत्यांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.