Take a fresh look at your lifestyle.

शाहरुख आणि राजकुमार हिराणी एकत्र ! फ्लॉप्सची मालिका अखेर संपणार

टीम, हॅलो बॉलीवूड । शाहरुखचा पुढचा चित्रपट कोणता असेल याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागलेली असताना, मध्येच बातमी आली कि तो साऊथचा दिग्दर्शक ऍटली सोबत चित्रपट साईन केला आहे. पण आता सुपरस्टार शाहरुखने ऑल टाइम सुपरहिट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा चित्रपट साइन केला आहे, अशी बातमी आहे. त्याचा शेवटचा रिलीज आनंद एल रायच्या ‘झिरो’च्या अपयशापासून सुपरस्टार त्याच्या पुढच्या प्रोजेक्टविषयी गप्प बसला आहे

सुपरहिट हिराणी यांचा एकही चित्रपट हिट श्रेणीतही मोडत नाही, सगळे सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट त्यांनी दिले आहेत. ‘ग्रेपवाईन’ साप्ताहिकामते, “या दोघांच्या प्रकल्पाविषयी चर्चा या वर्षाच्या सुरूवातीस सुरू झाली. शाहरुख खानने पुढचे चित्रपट निर्माता राजकुमार हिरानी यांचा चित्रपट फायनल केला आहे. हा मोठा प्रकल्प असल्याचे दिसते आणि एप्रिल किंवा मे २०२० मध्ये सेट लावले जातील. निर्माते या चित्रपटासाठी २०२१ च्या रिलीजचा विचार करीत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाचा कलाकार फायनल झालेले आहेत पण ते गुलदस्त्यात आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: