Take a fresh look at your lifestyle.

‘शक्तिमान’ फेम अभिनेत्रीला ग्लोबल अवॉर्ड्स दरम्यान अपमानास्पद वागणूक; व्हिडिओतून व्यक्त केल्या भावना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्यांनी ज्यांनी त्यांच्या लहानपणात शक्तिमान हि मालिका पाहिली आहे. त्यांच्यासाठी रिपोर्टर गीता हे पात्र नेहमीच लक्षात राहणारे आहे. आजही या मालिकेच्या टीआरपीला तोड नाही. कारण ९० च्या काळात अनेक अश्या मालिका होत्या ज्या तुफान गाजल्या आणि आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मात्र शक्तिमान हि मालिका अशी होती जी नुसती गाजली नाही तर लोकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतली. मालिकेतील शक्तिमान हे पात्र मुलांसाठी जणू रिअल लाईफ हिरो होता. त्यामुळे मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाकडून प्रेम मिळवले. यानंतर अलीकडे झालेल्या ग्लोबल अवॉर्ड्स दरम्यान शक्तिमान मालिकेतील गीता अर्थात अभिनेत्री वैष्णवी महंत यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुले चाहतेही नाराज आहेत.

याबाबत भावना व्यक्त करताना वैष्णवी यांनी स्वत: एक व्हिडीओ शूट करुन याविषयीची माहिती दिली आहे. वैष्णवी महंत यांनी त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांना आलेल्या वाईट अनुभवाचे कथन केलं आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, “अलिकडेच मला Mumbai Global Achievers Award या पुरस्कार सोहळ्यात आमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु, या कार्यक्रमात पोहोचल्यानंतर मला अपमानास्पद वागणूक मिळाली. या अवॉर्ड फंक्शनमध्ये मला बेस्ट अॅक्ट्रेस फॉरएव्हर हा पुरस्कार मिळणार होता. मात्र, मी पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर गेल्यानंतरही त्यांनी माझ्या जागी ‘वंदना’ असं नाव घेण्यास सुरुवात केली. हे एकदा नाही तर जवळ जवळ तीन ते चार वेळा झाल”. वैष्णवी यांच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना मिळालेल्या वागणुकीचा निषेध व्यक्त केला आहे.

शक्तिमान या मालिकेत अभिनेता मुकेश खन्ना आणि वैष्णवी महंत ही जोडी मुख्य भूमिकेत होती आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेली. मुकेश खन्ना यांनी या मालिकेत शक्तिमानची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री वैष्णवी यांनी गीता विश्वास अर्थात रिपोर्टर गीता ही व्यक्तिरेखा साकारली होती. आजही कलाविश्वात या मालिकेचा आणि या पात्रांचा उल्लेख केला जातो. आजही अनेकांसाठी शक्तिमान हि मालिका अव्वल आहे. अश्यातच अलिकडेच पार पडलेल्या ग्लोबल अवॉर्ड्स दरम्यान अभिनेत्री वैष्णवी महंत यांना अपमानास्पद वागणूक मिळणे हि बाब खेदजनक आहे.