Take a fresh look at your lifestyle.

शालू झाली परम सुंदरी; निळ्याशार ड्रेसमध्ये खुलून आले राजेश्वरीचे सौंदर्य – पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘फँड्री’ चित्रपटातील सोज्वळ, सालस आणि गुणी शालू म्हणजेच मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. आपल्या सहज सुंदर अभिनयाने राजेश्वरीने ‘फँड्री’ चित्रपटात उत्कृष्ट काम केले आणि आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर तिने रसिकांना अगदी भुरळ घातली. त्यामुळे राजेश्वरीचा एक वेगळा असा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. पण ‘फँड्री’मध्ये अत्यंत साधीसुधी दिसणारी राजेश्वरी आता फारच ग्लॅमरस आणि बोल्ड झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच आपल्या चाहत्यांना सुखद धक्के देत असते. कधी एखादे इन्स्टा रील तर कधी एखाद्या नव्या लूकमधील फोटो शेअर करून ती नेहमीच चाहत्यांची वाहवाह मिळवते. यानंतर आता चाहत्यांच्या लाडक्या शालूने ‘परम सुंदरी’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

 

मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरातने आपल्या अधिकृतसोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. मुख्य म्हणजे नेहमीप्रमाणे तिचा हा व्हिडीओदेखील तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार पाऊस पाडला आहे. हा डान्सिंग व्हिडीओ शेअर करताना राजेश्वरीनं ‘Param Sundari ‘ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमधील शालूचा लूक एकदम परमसुंदरी सारखाच आहे. निळ्या रंगाच्या परफेक्ट ड्रेसमध्ये राजेश्वरीचे सौंदर्य चांगलेच खुलून आले आहे. तिचं एका चाहत्याने तर असेही म्हटले आहे कि, ‘तुम्ही परफेक्ट आहात तुमच्या सारखं कुणीच नाहीये, तुम्ही खूप सुंदर आहात…’. कारण शालूचा हा लूक कमालीचा आहे. त्यामुळे साहजिकच कुणीही तिला सुंदर म्हणताना चुकणार नाही. पण काही असेही आहेत ज्यांना ट्रोल करायला काहीही चालतं.

राजेश्वरीच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्सचा नेहमीच पाऊस पडतो. राजेश्वरीचे कित्येक चाहते कधी चारोळी तर कधी कविता करीत तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसतात. तर काही लोक तीला ट्रोलदेखील करतात. पण ऐकून घेईल ती शालू कुठली. ट्रोल करणाऱ्या कमेंट्सना राजेश्वरी एकदम सडेतोड उत्तर देते. “सरकारने सर्वात आधी फँड्रीतल्या शालूच्या फोटोवरच्या कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते” अश्या प्रकारचे कितीतरी मिम्स सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत. पण याकडे दुर्लक्ष करून शालू आपल्या मस्त मौलाना अंदाजात जगताना दिसत आहे.