Take a fresh look at your lifestyle.

‘शेम ऑन असीम रियाझ’ ट्विटर ट्रेंडिंगवर; शेहनाजच्या खाजगी आयुष्यावर टिप्पणी केल्यामुळे झाला ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षात टेलिव्हिजन जगताला सगळ्यात मोठा धक्का देणारी एक्झिट सिद्धार्थ शुक्लाची ठरली. त्याच्या निधनामुळे मालिका जगतालाच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीलाही मोठा धक्का लागला होता. यानंतर सगळ्यात जास्त हळवी झाली होती ती पंजाबी अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल. सिद्धार्थ आणि शहनाजची मैत्री सगळ्यांनाच ठाऊक आहे. दरम्यान सिद्धार्थच्या अकाली निधनानंतर शहनाज सोशल मीडियापासून दूर राहताना दिसते. यानंतर अलीकडेच ती पुन्हा एकदा जगू लागली आहे असे तिच्या कृतींमध्ये दिसत आहे. अलीकडेच शेहनाजचे काही पार्टी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाले होते. ते पाहून तिचे चाहते तर आनंदी झाले मात्र बिग बॉस १३ एक्स कन्टेस्टंट असीम रियाजने नाराजी दाखवत तिच्या आयुष्यावर टिप्पणी केली. परिणामी शेहनाजच्या चाहत्यांनी शेम ऑन असीम रियाझ चा ट्रेंड सुरु केला.

पंजाबी गायिका आणि अभिनेत्री शेहनाज गिल हि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि असीम रियाज हे एकत्र बिग बॉस १३ मध्ये सह स्पर्धक होते. यानंतर सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज कोलमडून गेली होती. ती आता कुठे सामान्य आयुष्य जगायचं प्रयत्न करताना दिसतेय. अलीकडेच ती निर्माता कौशल जोशीच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये दिसली होती. शहनाज व्यतिरिक्त, पार्टीत कश्मीरा शाह, मोनालिसा, परितोष त्रिपाठी आणि जॉर्जिया एंड्रियानी यांच्यासह इतर सेलिब्रिटी होते.

कॉमेडियन परितोष त्रिपाठीने शहनाज, कश्मीरा आणि इतरांसोबतचा एक फोटो या प्रसंगातून टाकला. दरम्यान हे सारेच कौशलच्या आनंदात सहभागी होऊन नाचतानाही दिसले. यात शेहनाजही होती. हे पाहून असीम रियाझ भडकला आणि त्याने ट्विटरवर शेहनाजचे नाव न घेता तिला टोमणा लगावलाय. असीमने या ट्विटमध्ये लिहिले कि, “आत्ताच काही डान्सिंग क्लिप पाहिल्या … खरंच.. लोक किती लवकर आपल्या प्रियजनांना विसरतात.. क्या बात.. क्या बात… .. #Newworld.”

 

हे ट्विट पाहिल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले की हे ट्विट शहनाजसाठी करण्यात आलेलं आहे. अनेक चाहत्यांनी हे स्पष्ट मत मांडले आहे कि, असीम कोणाला जज करणारा किंवा त्यांच्या नात्यांबद्दल बोलणारा कोणी नाही. यातील एका व्हिडिओमध्ये शहनाज इतर कलाकारांसोबत ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स करताना दिसली.

तिने गाण्याची हुक स्टेपही केली. शहनाज तिच्या आनंदी स्वभावात परतली आहे आणि आयुष्यात जगण्याचा प्रयत्न करतेय हे पाहून तिचे चाहते आनंदी झाले असताना असीमच्या ट्विटने मात्र त्यांच्या आनंदाला कुठेतरी विरजण लावले.