हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. त्यामुळे अनेकदा ठिकठिकाणी व्याख्यानांमध्ये ते हिंदुत्ववादी विचार आणि सावरकरांचे विचार यांचा प्रसार करताना दिसतात. शिवाय परखड आणि थेट मत प्रकट करण्यासाठी शरद पोंक्षे यांना ओळखले जाते. दरम्यान शरद पोंक्षेंनी सांगलीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजींची भेट घेतली. त्यानंतर शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी टीकास्त्र डागले आहे.
शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळे ते विविध गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. शरद पोंक्षे यांनी संभाजी भिडे यांच्या भेटीचे काही फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय कि, ‘आज मिरजेत सायं व्याख्यान आहे तेव्हा सकाळी सांगलीत मा.भिडेगुरूजींना भेटण्याचा योग आला. ते तरुणांकडून व्यायाम व मारूतीची ऊपायना सुर्यनमस्कार करून घेत होते. छ शिवाजी महाराज तरूणांना समजाऊन सांगण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्च करणारे मा भिडे गुरूजी अशी माणसं आहेत म्हणून हिंदू धर्माचं कार्य सुरू आहे’.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये ते स्वतः आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेही पहायला मिळत आहे. शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर नेटकरी विविध कमेंट करत आहेत. यातील काही नेटकरी टीकादेखील करत आहेत. या पोस्टवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘मी जातीयवादी म्हणे हा जो कुत्रा आहे ना भिडे नावाचा तो म्हणे मनुस्मृती हे मानव धर्म शास्त्र आहे त्यात शुद्रांबद्दल काय लिहिले आहे ते वाच एकदा.ज्योतिबा फुले यांच्या बद्दल आपशब्द काढले याने. स्त्रियांबद्दल नेहमीच otthodox विचार मांडतो. टाकली लाव तर बोलेन वगैरेची भाषा करतो अरे एकविसाव्या शतकात राहतो आपण. टिकली लावायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे याने राष्ट्र निर्माण होत नसते… फक्त बामणांची दुकानं तेवढी चालतील फार फार तर’
Discussion about this post