Take a fresh look at your lifestyle.

‘.. तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्थान जगू शकेल’; उदयपूर हत्याकांडावर शरद पोक्षेंची पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली म्हणून उदयपूरमध्ये एका सामान्य शिंप्याची निर्घृण हत्या करण्यात आली. केवळ ऐकून किंवा वाचून अंगावर शहारा येत असेल तर त्या शिंप्याच्या कुटुंबीयांची काय अवस्था असेल. खरतर या व्यक्तीने आपल्याला मोबाईल नीट वापरता येत नाही अशी कबुली दिली होती. शिवाय मोबाईलवर नुपूर शर्मा यांचंही पोस्ट आलेली होती ती चुकून शेअर झाली असेही त्याने सांगितले होते. मात्र त्यास वारंवार मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या आणि अखेर धर्माच्या नावावर आणखी एक बळी गेला. या मृत शिंप्याचे नाव कन्हैयालाल असे होते. यानंतर विविध राज्यातूनही संतापाची लाट उसळली आहे. मराठी अभिनेता शरद पोंक्षे यांनीही आपले मत उघड केले आहे.

मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे हे याआधीही अनेक विषयांवर बेधडक बोलताना दिसले आहेत. अगदी सध्या राजकीय उलथापालथीवर देखील त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यांनतर आता उदयपूर मधील हत्याकांडावर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एका वाक्याचा आशय घेत पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत असं लिहिलं आहे की, ‘वंदे मातरम्… प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरू लागली तर आणि तरच कदाचित हा हिन्दुस्थान जगू शकेल- क्रांतिकारकांचा राजपुत्र वि. दा. सावरकर’. या फोटोला कॅप्शन देताना शरद पोंक्षे म्हणालेत की, ‘जे उदयपूरमधे घडले ते पाहिल्यावर स्वा. सावरकर पदोपदी आठवतात व त्यांचे विचार आठवतात. हिंदूनो जागे व्हा.’

त्याचे झाले असे कि, राजस्थानमधील उदयपूरमध्ये कन्हैय्यालाल या शिंप्याची भर दिवसा उजेडी गळा चिरुन निर्घृण स्वरूपात हत्या करण्यात आली. कारण होतं भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या पैगंबरांविरोधातील वक्तव्याला पाठिंबा देणे. ११ जूनला त्या व्हॉट्सअप स्टेटससाठी त्याच्या विरोधात त्याच्याच शेजारच्याने तक्रार नोंदवली होती आणि याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. पण त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत होती. दरम्यान ‘मला मोबाईल नीट वापरता येत नाही. माझ्या मुलाकडून व्हॉट्स अॅप स्टेटसवर ती पोस्ट झाली. १५ जूनपासून मला या धमक्या मिळत आहेत असे मृत्यूपूर्वी कन्हैय्यालाल म्हणाला होता. त्याने पोलिसांना सांगितलं होतं की, ‘नाजिमने त्याच्या समाजाच्या दबावाखाली येऊन तक्रार नोंदवली. काही दिवसांपासून नाजिम आणि त्याच्या सोबतीनं ५ जणं माझ्या दुकानासमोर फेऱ्या मारत आहेत. माझ्या फोटोला त्यांच्या समाजात व्हायरल केलंय आणि मला पाहताच जिवंत मारा असं सांगत आहेत’ अखेर २८ जून रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास कन्हैय्यालालची गळा चिरुन हत्या करण्यात आली.