हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रवादीचे खासदार आणि मराठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात साकारलेल्या नथुराम या भूमिकेवर सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. दरम्यान कुणी त्यांचं समर्थन करतय तर कुणी विरोध. यानंतर आता याअगोदर नथुरामाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले मी नथुराम साकारल्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला विरोध केला नाही, छगन भुजबळ तर माझ्या पाठिशी होते. मला अमोल कोल्हेंची खासदारकी आज आहे, उद्या असेल की नाही माहीत नाही. पण कलावंत म्हणून ते शेवटपर्यंत राहतील, असं म्हणत कोल्हेंच्या नथुरामला पाठिंबा दर्शवला आहे.
ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले कि, डॉ. अमोल कोल्हे असेल किंवा इतर कोणी असतील आम्ही सर्व कलावंत आहोत. अमोल कोल्हे खासदार नंतर झाले, ते आधीपासून कलावंत आहेत. त्यांनी बरीच काम केलेली आहेत. त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते खासदार झाले. खासदारकी आज आहे उद्या असेल की नाही माहीत नाही पण पण कलावंत म्हणून ते शेवटपर्यंत राहतील. कलावंत म्हणून आलेली भूमिका आपल्याला आवडली तर ती भूमिका केलीच पाहिजे. अमोल कोल्हे यांची वैयक्तिक भूमिका आणि कलाकार म्हणून वेगळी भूमिका असेल. त्यांना या विषयावरुन ट्रोल करणं हे योग्य नाही. २० वर्ष मीदेखील या सर्व त्रासाला सामोरे गेलो आहे. मी देखील नथुराम गोडसे यांची भूमिका केली होती.
https://www.youtube.com/watch?v=-kMdNHC5NFM
पुढे म्हणाले, मी नथूराम गोडसेची भूमिका केल्यानंतर पवार साहेबांनी मला विरोध केल्याचं आठवत नाही. त्यांच्या पक्षातील काही लोकांनी मला विरोध केला होता. मी नथुराम नाटक करत होतो. त्यावेळेला मंत्री छगन भुजबळ आमच्या पाठीशी होते. त्यामुळे आतादेखील हा चित्रपट बंद पाडण्याची भूमिका घेणे हा मूर्खपणा आणि वेडेपणा आहे. आम्ही पुरोगामी महाराष्ट्राचे आहोत हा सर्व दुटप्पीपणा आहे. कोणी बोललं म्हणून चित्रपट कलाकृती बंद होत नाही. ज्यांना सिनेमा बघायचा आहे त्यांनी तो जरूर बघावा. ज्यांना बघायचा नाही त्यांनी तो बघू नये. कलाकृतीवर बंदी आणण्याच्या मी पुन्हा एकदा पूर्ण विरोधात आहे.
Discussion about this post