Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वयाच्या 16व्या वर्षापासुन मला..’; प्रसिद्ध अभिनेत्यासोबतचा खास फोटो शेअर करत तेजस्विनीने दिली महत्वाची माहिती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tejasvini Lonari_Makrand Anaspure
0
SHARES
437
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ४ च्या माध्यमातून घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेली मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. मालिका, चित्रपट आणि रिऍलिटी शो करत तेजस्विनीने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेत तिने साकारलेली राजकीय भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती आणि यानंतर बिग बॉसमुळे तिचा चाहता वर्ग वाढला. दुखापतीमुळे तिला हा शो सोडावा लागला मात्र प्रेक्षकांनी तिला विजेती घोषित करत प्रेमाचा वर्षाव केला. यानंतर आता लवकरच तेजस्विनी खूप वर्षानंतर पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मराठी चित्रपटात दिसणार आहे. या सुखद धक्क्याने चाहतेसुद्धा भारावून गेले आहेत

View this post on Instagram

A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

‘बिग बॉस मराठी’नंतर तेजस्विनी लोणारीने बरेच चित्रपट साईन केल्याचे समोर आले आहे. यापैकी एक चित्रपट तिच्यासाठी बराच खास ठरणार आहे. कारण या आगामी चित्रपटातून ती पुन्हा एकदा अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मोठा पडदा गाजवणार आहे. याआधी तेजस्विनी लोणारीने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘बायको नंबर १’ आणि ‘गुलदस्ता’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केल आहे. यानंतर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा हि जोडी नवा धमाल चित्रपट घेऊन येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

याबाबत स्वतः तेजस्विनीने लोणारीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. हि पोस्ट शेअर करताना तेजस्विनीने मकरंद अनासपुरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मला जे गुरु आणि सहकलाकार म्हणून लाभलेले मकरंद अनासपुरे सर, ज्यांच्याबरोबर पाच चित्रपट करण्याचा योग आला आणि त्या चित्रपटांमुळे जी प्रसिद्धी मिळाली आता हीच जोडी तुमच्यासाठी घेऊन येत आहे…धमाकेदार चित्रपट…’. तेजस्विनीच्या या पोस्टवर तिचे चाहते या चित्रपटाबाबत उत्सुकता दाखवत आहेत आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Tags: Instagram Postmakrand anaspureTejaswini LonariUpcoming Marathi MovieViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group