Take a fresh look at your lifestyle.

बक्कळ पैसे कमावणाऱ्या सेलिब्रिटींना घेऊन….; ‘हर घर तिरंगा’ गाण्यावर शशांक केतकर संतापला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असा विशेष अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या निमित्ताने भारत सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ नामक एक अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत एक अँथम सॉंग देखील रिलीज करण्यात आले. या मोहिमेशी अनेक भारतीय कलाकार, क्रिकेट संघातील सदस्यदेखील जोडलेले आहेत. जेव्हा ‘हर घर तिरंगा’ हे अँथम सॉन्ग रिलीज झाले तेव्हा यात हे सगळे सेलिब्रिटी दिसून आले. या गाण्याला आणि मोहिमेला अभिनेता शशांक केतकर याने थेट विरोध दर्शवला आहे.

अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने हर घर तिरंगा या अँथम सॉन्गचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘चला चला विरोध करा… सगळ्या बक्कळ पैसे कमावणाऱ्या celebrities ना घेऊन केलेल्या गाण्याला विरोध करा . यातून अजिबात inspire वगैरे तर होऊच नका. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुध्धा एक ऊर्जा मिळते वगैरे सगळं खोटं आहे. जुन्या पिढ्यांनी जी आत्ता पर्यंत वाट लावली, तीच देशासाठी योग्य आहे. Young, वेगळा दृष्टिकोन वगैरे काही नसतं.’

पुढे लिहिलं आहे कि, ‘भारताचा झेंडा घरो घरी असावा…. ही positive भावना १४० कोटी लोकांच्या मनात रुजावी या साठी आपल्या सरकारला campaign करावं लागतं ??? जगातल्या प्रत्येक देशात काही ना काही problems आहेत, पण जेव्हा जगासमोर मांडलेल्या त्यांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा ते सगळे कट्टर होतात. देशासाठी पेटून उठतात. आपण केव्हा कट्टर भारतीय होणार ? आपण केव्हा आपल्या देशाचा विचार करणार ? जय हिंद..

या गाण्यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, अजय देवगण यांसह अनुष्का शर्मा देखील दिसत आहे. याशिवाय इंडियन क्रिकेट टीममधील लेजेंड्स कपिल देव, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यासह ऑलिम्पिक विजेते मेरी कॉम, निरज चोप्रा असे भारताचे हिरे देखील या गाण्यात दिसत आहेत. इतकेच काय तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील किर्ती सुरेश, प्रभास हेदेखील गाण्यात दिसत आहेत. हे गाणे सुमधुर गायिका आशा भोसले आणि सोनू निगम यांनी गायले आहे.