Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘..यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या’; शशांक केतकरने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 21, 2022
in बातम्या, फोटो गॅलरी, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shashank ketkar
0
SHARES
245
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक नावाजलेले नाव म्हणजे शशांक केतकर. आपल्या अभिनयाइतकाच तो स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. यामुळे कित्येकदा त्याला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. पण थांबेल तो शशांक कुठे…. याहीवेळी त्याने सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट केली आहे जी चांगलीच चर्चेत आली आहे. फक्त यावेळी फरक इतकाच कि तो ट्रोल होत नाहीये. तर यावेळी लोक त्याला समर्थन देत आहेत. रस्त्यांची बिकट अवस्था आणि त्यामुळे नागरिकांचा कासावीस होणार जीव हि परिस्थिती आपल्याला काही नवीन नाही. पण यावर सहसा कुणी बोलत नाही. अशा परिस्थितीवर भाष्य करीत त्याने ‘ये नहीं चलेगा मोहीम’ राबविण्याचे योजिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

मराठी अभिनेता शशांक केतकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने मालाड येथील एका परिसरातील रस्त्यांची अवस्था दाखवली आहे. ‘राजकारण वगैरे या गोष्टींपेक्षा सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन रस्त्यांसाठी काहीतरी करा. कारण यामुळे लोकांचा जीव जातोय.. म्हणूनच कृपा करुन काहीतरी करा’, असा त्रागा करीत शशांकने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने मुद्देसूद मंडळी केली आहे. यामध्ये त्याने लिहिलंय कि,

मुद्दा क्र. 1 – तू मूळचा पुण्याचा आहेस… तिथल्या रस्त्यांची काळजी कर तू. आम्हाला नको अक्कल शिकवू वगैरे म्हणणार्‍या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या.

मुद्दा क्र. 2 – हा video मुळात कोणाच्या तरी support साठी आणि कोणाला तरी विरोध म्हणून केलेला नाही. हे प्रश्न जनतेचे आहेत आणि ते फक्त एका शहरा पुरते मर्यादित नाहीत. हे देशातल्या सगळ्या roads बद्दल माझं म्हणण आहे.

मुद्दा क्र 3 – रस्त्याच्या अशा अवस्थेला जे जबाबदार असतात त्यांनी एकदा हे imagine करून बघाव की ते त्यांच्या लहान मुला मुलीला या international school मध्ये सोडायला bike वरून आले आहेत किंवा म्हातार्‍या आई बाबांना डॉक्टर कडे घेऊन आले आहेत किंवा बायको बरोबर आहेत किंवा अगदी एकटे आहेत आणि ती तुमची bike या खड्यात अडकून बंद पडली, तुमचा तोल गेला, मागून bus आली आणि तुमच्या डोक्याचा चुरा करून गेली! एकदा imagine करा ही भीती!

मुद्दा क्र 4 – उत्तम सोयी आणि उत्तम रस्ते मिळाल्यावर ते नीट वापरण्याची जबाबदारी आपली नागरिकांची सुद्धा आहे.

मुद्दा क्र 5 – चला एक movement सुरू करु. हा चलता है attitude संपला पाहिजे! तुम्हाला असे रस्ते दिसले तर त्याचा Video post करा. मला आणि योग्य त्या authorities ना त्यात tag करा आणि हे करताना #YeNahiChalega हा hashtag वापरा.

सध्या शशांकची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. शिवाय लोकदेखील त्याच्या या मोहिमेला समर्थन देताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये सत्य परिस्थिती हीच आहे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनेकांनी शशांकने मांडलेल्या मुद्द्यांसाठी त्याचे कौतुक केले आहे. यानंतर आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे शशांकने सुरु केलेल्या #yenahichalega उपक्रमात किती लोक उत्स्फूर्तपणे आणि आत्मीयतेने सहभागी होत आहेत. शिवाय त्याने टॅग केलेल्या सत्ताधाऱ्यांचे याबाबत काय म्हणणे असणार आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Tags: Instagram PostMarathi ActorsShashank KetkarViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group