Take a fresh look at your lifestyle.

ती प्रेग्नेंट आहे ..?; फरहान- शिबानीच्या लग्नाचे व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांनी लावले अजब तर्क

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड मॉडेल शिबानी दांडेकर यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हे एक बहुचर्चित कपल आहे. फरहानचे हे दुसरे लग्न असून त्याचा पूर्व पत्नीसह घटस्फोट झाला आहे. फरहान शिबानी गेले अनेक दिवस एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सारेच जाणतात. यानंतर अखेर त्यांनी अख्तर यांच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसमध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र हे फोटो पाहून नेटकाऱ्यानी शिबानी प्रेग्नेंट आहे असा असा तर्क लावला आहे. तर अनेकांनी हि बातमी खरी आहे का अशी विचारणा केली आहे.

केलं आणि लग्नाच्या विषयाला पुर्णविराम दिला. फरहान अख्तरचं हे दुसरं लग्न असून त्याने पहिल्या पत्नीसोबत 16 वर्षे संसार देखील केला आहे. तसेच त्याला पहिल्या पत्नीकडून दोन मुली देखील आहेत. फरहान अख्तर याची बाहेर अफेअर सुरू असल्याचे समजताच पहिल्या पत्नीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिबानी दांडेकर ही फरहानच्या आयुष्यात आली. चार वर्षे दोन एकत्र राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

फरहानची- शिबानीचे लग्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते. यानंतर आता त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मुख्य बाबा अशी कि व्हायरल फोटोंवर नेटकरी शिबानी प्रेग्नेंट असल्याचे बोलत आहेत. इतकेच नव्हे तर अनेकजण याबाबत पक्का दावा करताना दिसत आहेत. अनेकांनी उपस्थित केलेल्या या शंकेचे आपण निरसन करूया. व्हायरल फोटोंवरील कमेंट्स जरी सांगत असल्या कि शिबानी प्रेग्नेंट आहे तरी असे काहीही नाही आहे. हा केवळ एक तर्क असून नेटकऱ्यांनी उपस्थित केलेली शंका आहे.
लग्नाचा पेहराव असा होता कि यामध्ये शिबानीचे पोट दिसून येत होते. यामुळे कदाचित गैरसमज झाल्यामुळे अनेकांना शिबानी लग्नाआधी प्रेग्नेंट आहे असे भासले असेल. परंतु हि केवळ एक शंका असून यात काहीही तथ्य नाही. त्यामुळे तूर्तास तरी या चर्चांवर अंकुश लावून नाव दांपत्याला त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा!