Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मी तुला पुन्हा भेटेन! सिद्धार्थच्या वाढदिवशी शहनाज झाली भावुक; केक कापून एकटीनेच केला बर्थडे सेलिब्रेट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 12, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
SidNaaz
0
SHARES
4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीचा अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन काही औरच होता. या सिजनमध्ये राडे झाले, बाचाबाची, भांडण, कपडे फाडणे, रडारडी असं बरंच काही झालं. पण लक्षात राहिले ते सिडनाज.. या सिजनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला आणि स्पर्धक शहनाज गिल यांची दिल, दोस्ती, दुनियादारीवाली केमिस्ट्री सगळ्यांनाच भावली. पण काळाने घाला घातला आणि २ सप्टेंबर २०२२ रोजी सिद्धार्थ शुक्लाचे हार्ट अटॅकने निधन झाले. हा धक्का पचवताना शहनाज पूर्ण खचून गेली पण पुन्हा राहिली ती सिद्धार्थने दिलेल्या विश्वासाच्या बळावर. आजही त्याच्या आठवणीत अनेकदा तिचे डोळे ओले होतात. त्यात आज तर सिद्धार्थचा वाढदिवस… शहनाजने एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होतेय.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कलाकार दिवंगत सिद्धार्थ शुक्ला याचा आज १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची मैत्री आणि मैत्रीतून झालेलं प्रेम याबद्दल सगळेच जाणतात. पण काही कहाण्या अधुऱ्या राहतात तशीच हि एक कहाणी अधुरी राहिली. सिद्धार्थच्या निधनाने त्यांची ताटातूट झाली. आज सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त शहनाजने केक कापून आजचा दिवस सेलिब्रेट केला आहे. याचे फोटो तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये शेअर केले आहेत.

यासोबत शहनाजने तिचे आणि सिद्धार्थचे काही रोमॅंटिक फोटोही यासोबत शेअर केले आहेत. तसेच सिद्धार्थचा फोटो पोस्ट करत शहनाजने त्याच्या आठवणीत लिहिले आहे कि, ‘मी तुला पुन्हा भेटेन’. शहनाजच्या या पोस्टवर तिच्या आणि सिद्धार्थच्या चाहत्यांनी कमेंट्स करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिद्धार्थच्या आठवणीत आज अनेक जण भावूक झाले आहेत. काही लोक हयात नसतात पण हृदयात असतात. याची प्रचिती सिद्धार्थ शुक्लाच्या बाबतीत नेहमीच येत राहील.

Tags: Birthday PostInsta PostInstagram StoryLate Siddharth ShuklaShehnaj Gill Kaurviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group