Take a fresh look at your lifestyle.

आम्ही अजून माघार घेतली नाही ; एम्सच्या रिपोर्ट वर शेखर सुमन असमाधानी

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्येला तीन महिने होऊन गेले. सुशांतचा मृत्यू नक्की आत्महत्या आहे की हत्या ही शंका सर्वाना होती. परंतु एम्स रुग्णालयाच्या एका रिपोर्टने सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. सुशांतसिंग राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

एम्सच्या रिपोर्टवर बॉलिवूड अभिनेता शेखर सुमननी फेटाळला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने याप्रकरणी आपला संताप व्यक्त केला. ‘सुशांतच्या न्यायासाठी आम्ही सर्वांनी लढा दिला. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता आवाज उठवला. मात्र याप्रकरणाने आपली दिशा बदलली. परंतु आम्ही आम्ही अद्याप माघार घेतली नसल्याचं वक्तव्य त्याने केलं.

तसेच सीबीआयकडून अंतिम रिपोर्ट येणार आहे. तो रिपोर्ट देखील प्रकरणाला न्याय देणारा नसेल तर आम्ही ही लढाई आमच्या मनात चालू ठेवू कारण सत्य काय आहे हे आम्हाला ठावूक आहे, अशा प्रकारे AIIMS चा रिपोर्ट शेखर सुमन यांनी फेटाळला. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’