Take a fresh look at your lifestyle.

सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली ?? शेखर सुमन पुन्हा संतापले

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन |

सुशांतचा मृत्यू हत्या नसून ती आत्महत्याच आहे, असा अहवाल एम्सच्या टीमने सीबीआयला दिला. या अहवालानंतर अनेकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. त्यापाठोपाठ ड्रग्ज प्रकरणात अटक झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलाही जामीन मंजूर झाला. या दोन घटनाक्रमामुळे सुशांत केसचे अख्खे समीकरण बदलले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते शेखर सुमन यांनी केलेले एक  ट्विट केले आहे. या  ट्विटमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली गेली. श्वास गुदमरला की, असेच फिक्स केले,’ असे  ट्विट शेखर सुमन यांनी केले आहे. या  ट्विटचा अर्थ स्पष्ट आहे. शेखर यांनी थेटपणे तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सुशांतने आत्महत्या केली, असा निष्कर्ष सीबीआयने या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासातून काढला आहे. एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनीही सुशांतसिंहने आत्महत्याच केली असल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते. सुशांतसिंह मरण पावला त्यावेळचा सारा घटनाक्रम सीबीआयने पुन्हा तपासून पाहिला होता. सुशांतला आत्महत्या करणे भाग पडले असा जो संशय व्यक्त करण्यात येत होता तो निरर्थक असल्याचे सीबीआयच्या आजवरच्या तपासातून सिद्ध झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.