फर्स्ट लुक । ‘शिकारा’ हा काश्मिरी पंडितांच्या हकालपट्टीवरून झालेल्या तणावपूर्ण घटनांवर, तेव्हाच्या सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये त्याची वारीचं अंग पाहायला मिळतात. चित्रपटाची टॅगलाइन ‘काश्मिरी पंडितांची अनटोल्ड स्टोरी’ असे आहे. १९९० मधली गोष्ट असून, ट्रेलरचा असा दावा आहे की 4 लाखाहून अधिक काश्मिरी पंडितांना घरे सोडून जावे लागले.
परिंदा, १९४२- अ लव्ह स्टोरी, परिणीता यानंतर खूप वर्षांनी विधू विनोद चोप्रा दिग्दर्शकाचा खुर्चीवर बसले आहेत. त्यामुळे चितारपटाकडून खूप अपेक्षा असतील, यात वाद नाही. चित्रपटाचे लेखन विधु विनोद चोप्रा, राहुल पंडिता, अभिजत जोशी यांनी केले आहे. मूळ संगीत एआर रहमान आणि कुतुब-ए-क्रिपा यांनी दिले आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन, एडिटिंग आणि निर्मिती हि तिन्ही कामं विधू विनोद चोप्रा यांनी स्वतःच्या खांद्यावर पेलली आहे. या चित्रपटात सादिया आणि आदिल खान या दोन नवख्या कलाकारांची ओळख करून दिली आहे. चित्रपटाची कहाणी त्यांच्या घरातून निघताना आणि निर्वासिताच्या छावणीत पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या तिथल्या त्यांच्या संघर्षावर लक्ष केंद्रित करते.