Take a fresh look at your lifestyle.

शिल्पा – राज कुंद्राला जबरदस्त फटका; सेबीच्या नियमोल्लंघन प्रकरणी ३ लाखांचा दंड ठोठावला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पॉर्न चित्रपट निर्मिती आणि ऍपच्या माध्यमातून प्रसरण या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा याला अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणी न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे. सध्या या संदर्भात पोलिसांकडून कुंद्राची व संबंधितांची कसून चौकशी सुरु आहे. तर शिल्पा शेट्टीच्या अडचणी दिवसागणिक केवळ वाढत चालल्या आहेत. आधी काम सुटू लागली आणि त्यानंतर आता सेबीने शिल्पा शेट्टीला तब्बल ३ लाखांचा दंड ठोठावला आहे. कारण असे कि, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या वियान इंडस्ट्रीजने सेबीच्या इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यामूळे हा दंड सुनावला आहे.

राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवून अॅपच्या माध्यमातून शेअर केल्याच्या आरोपाखाली १९ जुलै २०२१ रोजी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. यानंतर राज कुंद्राचे बँक खाते तसेच आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिटर नेमला आहे. तर गुन्हे शाखेच्या मते, कंपनीशी संबंधित राज कुंद्रा , शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि इतरांच्याही बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर्सना बोलवण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या शिल्पा शेट्टीला कोणत्याहीप्रकारे अद्याप क्लीन चिट दिलेली नाही.

पुढे म्हणाले, कुंद्रा यांचे बँक खाते आणि विवान इंडस्ट्रीजचे संयुक्त खाते, ज्यात शिल्पा शेट्टी दिग्दर्शक होत्या, याचीही चौकशी सुरु आहे. ही कंपनी कथित पॉर्न फिल्म प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे. शिवाय, कुंद्राकडे अशी अनेक बँक खाती आहेत ज्यात परदेशी पैसे जमा होते. तर, शिल्पा शेट्टी यांनी संचलित केलेल्या कोणत्याही बँक खात्यातील व्यवहारांची माहिती आतापर्यंत तपासकार्यात निदर्शनास आली नाही. तसेच ‘हा तपासाचा भाग असल्याने खात्यांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही. ‘