Take a fresh look at your lifestyle.

….म्हणून फोटोग्राफरवर भडकली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाच  प्रमाण अजूनही कमी आले नाही. सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडा वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कलाकरांनादेखीन करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. अशातच सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती फोटोग्राफरवर भडकली असल्याचे दिसत आहे.

‘वूम्प्ला’ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा फोटोग्राफरशी ओरडताना दिसत आहे. ‘सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. तुम्ही मास्क का लावले नाही. तुझे मास्क कुठे आहे?’ असे रागात शिल्पा बोलताना दिसत आहे. सध्या शिल्पाचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे.

शिल्पा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती पती राज कुंद्रासोबतचे व्हिडीओ सतत शेअर करत असते.

Comments are closed.

%d bloggers like this: