Take a fresh look at your lifestyle.

पतीच्या कारनाम्यामुळे शिल्पा शेट्टी अडचणीत; अब्रू नुकसानीसह कोट्यवधींचे नुकसान करतेय सहन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती आणि एकेकाळचा प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर अद्यापही त्याला जामिन न मिळाल्यामुळे तो न्यायालयीन कोठडीची पाहुणचार घेत आहे. या प्रकरणामुळे कधी नव्हे ते राज कुंद्राचे नाव इतके उचलले गेले कि शिल्पा शेट्टीच्या प्रसिद्धीला जणू ग्रहणच लागले. पतीला अटक झाल्यापासून शिल्पा साधी घराबाहेरसुद्धा पडलेली नाही. अगदी ‘सुपर डान्सर ४’च्या सेटवरसुद्धा शिल्पा दिसली नाही. त्यामुळे तिच्याजागी ऐनवेळी करिश्मा कपूर गेस्ट जज बनून शोमध्ये आली आहे. त्यामुळे आता शिल्पा शोमध्ये परतणार का? याचे उत्तर देणे कठीण आहे. या प्रकरणामुळे शिल्पाला हातातली काम सोडून आर्थिक नुकसान झेलावे लागत आहे.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, ‘सुपर डान्सर ४’च्या एका एपिसोडसाठी शिल्पा १८ ते २२ लाख रूपये मानधन घेते. पण आता शोमध्ये ती नसल्यामुळे आतापर्यंत तिचे साधारण २ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. राजला अटक केल्यावर शिल्पाचीही चौकशी झाली. यावेळी अधिकारी राज कुंद्राला सोबत घेऊन गेले असता शिल्पाला अश्रू अनावर झाले होते.

सुत्रांनुसार, मुंबई क्राइम ब्रांच अधिकारी जेव्हा शिल्पाच्या जुहूस्थित घरी चौकशीला गेलेले तेव्हा शिल्पा राजला बघून वैतागली होती. या केसने परिवाराची बदनामी केली आहे. अनेक एंडोर्समेंट, बिझनेस डील्स हातून गेल्या आहेत. हे सर्व तू का केलंस? या प्रकरणामुळे आपली किती बदनामी झाली?, असे ती रडत रडत राजवर चिडत त्याला म्हणाली होती.

सध्या गॉसिप्स आणि चर्चेनुसार, राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा अद्याप तरी घराबाहेर पडलेली नाही. शिवाय सोनी टीव्हीसोबतही तिने काहीही कश्याहीप्रकारचा संपर्क केलेला नाही. त्यामुळे ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत चॅनलनेसुद्धा अन्य पाहुण्या कलाकारांसोबत शो चालू ठेवला आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर सुपर डान्सरच्या किमान या सीझनमध्ये तरी शिल्पा परत जज म्हणून दिसेल असे वाटत तरी नाही. कदाचित आता ती थेट शोच्या पुढच्या सीझनमध्ये परतेल किंवा मग कधीच नाही.