Take a fresh look at your lifestyle.

पॉर्नोग्राफी केसप्रकरणी शिल्पा शेट्टी- कुंद्राची ६ तास चौकशी; काय म्हणाली अभिनेत्री? जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक केली असल्याचे आपण सारेच जाणता. यानंतर मात्र आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. जुहूस्थित राहत्या घरी शिल्पाची पोलीस चौकशी करण्यात आली आहे. शिल्पाच्या जुहूमधील आलिशान घरात क्राईम ब्रांचने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला आणि या छाप्यात त्यांनी राजचा लॅपटॉप जप्त केला आहे. अटकेत असलेल्या राजच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात तिचा सहभाग आहे का? याची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली. राजसह क्राईम ब्रांचची टीम त्यांच्या घरी गेली असता शिल्पाचा जबाब आणि धाडसत्र ६ तासांनी संपल्यावर पोलिसांचे पथक राज कुंद्रासह घराबाहेर पडले.

तर, मुंबई पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीने चौकशीत सांगितले कि, ‘हॉटशॉट्स’शी तिचा काहीही संबंध नाही. इरोटिका पॉर्नपेक्षा वेगळी असून तिचा नवरा राज कुंद्रा अश्लील सामग्री तयार करण्यात गुंतलेला नसल्याचे देखील तिने नमूद केले आहे. ‘ शिल्पा शेट्टीच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी हा त्या कामात सामील आहे.” मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने घराची झडती घेतली असून राजचा लॅपटॉप ताब्यात घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिल्पा शेट्टी कुंद्रा कंपनी वियान इंडस्ट्रीजच्या संचालक पदी असल्याने पोलिसांनी विचारपूस करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने या पदाचा राजीनामा दिला होता.

या चौकशीत पोलिसांनी शिल्पाला अनेक महत्वाचे प्रश्न विचारले यात, विआन कंपनीच्या संचालक पदावर शिल्पा शेट्टी किती काळ होती? तिला अश्लील चित्रपट निर्मितीबाबत काही कल्पना होती का? या रॅकेटचा कारभार विआन कंपनीच्या ऑफिस मधून चालत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे २०२०मध्ये तिने विआन कंपनीच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा का दिला? या प्रश्नांचा समावेश होता. तर, शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यांचाही तपास केला जाणार आहे. शिवाय गुन्हे शाखेने कुंद्रा घरावर छापा टाकला तेव्हा घरात सर्व्हर आणि ९० व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. याबाबत राज कुंद्राला विचारले असता, इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणे बोल्ड कंटेंट तयार केले परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेले नाही असा त्याने दावा केला आहे.

सध्या राज कुंद्रा आणि त्याच्या पार्टनरची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे या दोघांच्या कोठडीची मुदत वाढवण्याची विनंती केली होती. हि विनंती न्यायालयाने मान्य करून त्यांची कोठडी २७ जुलै २०२१ पर्यंत वाढवली असून त्यांची रवानगी थेट भायखळा कारागृहात केली आहे.