Take a fresh look at your lifestyle.

‘सुपर डान्सर 4’च्या सेटवर शिल्पा शेट्टी कुंद्राचे पुनरागमन; शोमध्ये परतताच अश्रू झाले अनावर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफिकी चित्रीकरणाच्या आरोपाखाली गेल्या १९ जुलै २०२१ला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. यानंतर द्यपही तो तुरुंगातच असून या प्रकरणाचा अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कामावर अतिशय गंभीर परिणाम झाला. सोशल मीडियावर तिला जबरदस्त ट्रोल केले गेले. इतकेच काय, तर ‘हंगामा २’ या तिच्या नव्या चित्रपटाचा प्रमोशन इव्हेंटदेखील तिने टाळला. शिवाय ‘सुपर डान्सर 4’चे जजपद सोडून ती अनेक दिवस शोपासून लांब राहिली. पण आता शिल्पा पुन्हा एकदा शोमध्ये परतली आहे आणि तिने शूटींग सुरु केले आहे. या दरम्यान सेटवर शिल्पा रडली असून यामागील कारण अतिशय भावुक करणारे आहे.

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय डान्सिंग रिऍलिटी शो ‘सुपर डान्सर 4’च्या सेटवर व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडत असतानाचा शिल्पच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरळ भयानी याने शूट केला असून आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा फोटोग्राफर्सला हात दाखवून अभिवादन करताना दिसत आहे. शिवाय तिच्या चेह-यावर उदासपण आणि खिन्नपणा स्पष्ट दिसत आहे. शिल्पाने अश्याच उदास चेह-याने ‘सुपर डान्सर 4’च्या सेटवर एन्ट्री घेतली. तिला अपेक्षा नव्हती कि तिच्यासोबत सर्वांची वागणूक व्यवस्थित असेल. पण शोच्या सेटवर तिचे जोरदार स्वागत झाले आणि हे स्वागत पाहून शिल्पा अक्षरशः भावुक झाली. याच दरम्यान तिला तिचे अश्रू अनावर झाले आणि ती रडू लागली.

बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, शूटींगसाठी शिल्पा सेटवर येताच अनुराग बासू आणि गीता कपूर यांनी तिचे अगदी उत्साहात व आनंदात स्वागत केले. इतकेच नव्हे तर सर्व स्पर्धकांनीही तिला मिठ्या मारून आनंद साजरा केला. शिल्पाला मध्यंतरी घडलेल्या प्रकरणानंतर कदाचित हे इतके प्रेम अपेक्षित नसावे. त्यामुळे असे आनंदाचे स्वागत पाहून शिल्पा अगदी ढसाढसा रडू लागली. यानंतर संपूर्ण टीमने मिळून तिला शांत केले. अभिनेत्री शिल्पा शेट्टी २०१६ सालापासून ‘सुपर डान्सर’ या डान्सिंग रिऍलिटी शोची परीक्षक अर्थात जज आहे. त्यामुळे शोचे निर्माते शिल्पाची प्रतीक्षा करत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.