Take a fresh look at your lifestyle.

शिल्पा शेट्टीच्या फॉलोवर्ससाठी मोठी बातमी; अभिनेत्रीचा सोशल मीडियाला Bye Bye

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या आयकॉनिक लूक आणि जबरदस्त फिगरसाठी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर चर्चेत असते. इतकेच काय ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्यामुळे ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

याशिवाय ती नेहमीच आपल्या पोस्ट्समधून आपल्या चाहत्यांना फिटनेससाठी प्रोत्साहन देत असते. तुम्हीही शिल्पाचे फॉलोवर आहात..? मग तुमच्यासाठी अतिशय वाईट बातमी आहे. वाईट बातमी अशी कि शिल्पा सोशल मीडिया पासून लांब जातेय. होय लांब. म्हणजे गुड बाय.

सतत सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने नुकतेच सोशल मीडियाला गुड बाय करतेय असा मोठा निर्णय घेऊन थेट सोशल मीडियावर हि पोस्ट केली आहे. तिच्या या एका पोस्टमूळे तिच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिने हि पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काळ्या रंगाची ब्लॅक इमेज शेअर केली आहे आणि सोबत कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिले आहे कि, ‘सारखी एकच गोष्ट करून कंटाळा आला आहे, सर्व काही एकसारखेच दिसत आहे… जोपर्यंत मला नवीन अवतार मिळत नाही तोपर्यंत सोशल मीडियापासून दूर जात आहे.’

आता शिल्पाच्या पोस्टवरून तरी असं वाटतंय कि शिल्पा बहुतेक लूक बदलणार आहे. पण कायमचा सोशल मीडिया सोडेल असे वाटत तरी नाही. कारण ती म्हणतेय नवीन अवतार मिळेपर्यंत… आता कोणता नवीन अवतार घेऊन शिल्पा पुन्हा अवतरणार आहे ते तीच तिलाच ठाऊक. तूर्तास तिच्या या पोस्टवर भरमसाठ कमेंट्स पडताना दिसत आहेत. शिल्पा सध्या गोव्यात रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजचे शूटिंग करत आहे. रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्समधील ती पहिली महिला पोलीस बनली आहे.

मुख्य म्हणजे या वेब सीरिजच्या माध्यमातून ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेब सीरिजच्या दुनियेत पदार्पण करतेय. शिल्पासोबत या वेब शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय देखील दिसणार आहेत.