Take a fresh look at your lifestyle.

‘ओ वूमनिया’! वयाच्या चाळिशीनंतरही शिल्पाच्या अदांवर चाहते होतात घायाळ; पहा लेटेस्ट लूक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हि बॉलीवूड इंडस्ट्रीतील अत्यंत फीट सेलिब्रिटींपैकी एक आहे. सध्या तिचं वय जरी चाळीशी उलटलेलं असलं तरीही ती अजूनसुद्धा विशीची दिसते. शिल्पा आता ४६ वर्षाची असून तिची फिगर तरुणींना लाजवेल अशी आहे. तिचा प्रत्येक लूक आणि प्रत्येक अंदाज तिला अगदी सूट करतो. त्यामुळे आजही शिल्पाच्या अदांवर चाहते फिदा होताना दिसतात. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये तिने घागरा चोली परिधान केली असून यात ती कमाल दिसतेय. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहता यावे यासाठी नेहमीच शिल्पा तिच्या सोशल मीडिया जगतात सक्रिय असल्याचे दिसते. यात कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ती सोडत नाही. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ती चाहत्यांसोबत आपले विविध लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आताही तिने सोशल मीडियावर काही फोटोंसह व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने घागरा चोली परिधान केले आहे. यात तिची फिगर इतकी क्लास दिसतेय कि पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल. इतकेच नव्हे तर इतक्या आत्मविश्वासाने तिने परिधान केलेल्या घागरा चोलीचा लूक हा अगदी ट्रेंडिंगमध्ये आहे.

शिल्पाचा हा लूक इतका लक्षवेधी आहे कि सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यात शिल्पाने परिधान केलेल्या घागऱ्याची बांधणी रंगसंगती अतिशय सुंदर आहे. यातील प्रत्येक रंग शिल्पाच्या सौंदर्याला चार चांद लावताना दिसत आहेत. शिवाय शिल्पाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून वाटतंय कि तिने परिधान केलेला घागरा तिला स्वतःलाच फार आवडला आहे. या फोटो आणि व्हिडिओवर अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. एकाने लिहिलं आहे कि, बाबा ग्लॅमर असावा तर असा. शिवाय आणखी एकाने म्हटलंय कि, तुझा फोटो पाहून मला वर्कआउट करण्यासाठी प्रेरणा मिळतेय. याशिवाय तिच्या घागऱ्याचे कौतुक करत कमेंट केली आहे.