Take a fresh look at your lifestyle.

शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टींची पोलीस स्टेशनमध्ये धाव; फसवणूकीविरोधात पोलिसात केली तक्रार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठवड्याभरापासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा या दोघांचे नाव मीडियामध्ये चांगलेच चर्चेत आहे. पोर्नोग्राफीक व्हिडिओंमुळे राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर शिल्पाच्या अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. त्यानंतर आता शिल्पा शेट्टीच्या आईने पोलिसात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. मुख्य बाब अशी कि, या प्रकरणाचा राज कुंद्रा किंवा शिल्पा शेट्टी यांच्याशी संबंध नाही. शिल्पाची आई सुनंदा शेट्टी यांनी सुधाकर घारे यांच्याविरोधात जुहू पोलिस ठाण्यात जमीन फसवणूकीबद्दल तक्रार दिली आहे. ही तक्रार कर्जत जिल्हा रायगड येथील संबंधित आहे.

सुनंदा शेट्टी यांनी फिर्यादीत म्हटले की, त्यांनी सुधाकर यांच्याशी कर्जत येथून २०१९ ते २०२० फेब्रुवारीपर्यंत जमीन करार केला होता. त्यावेळी त्यांनी ही जमीन स्वमालकीची सांगून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सुनंदा यांना १ कोटी ६० लाखांना विकली. यानंतर काही दिवसांनी सुनंदा यांना सत्य कळताच सुधाकर यांना विचारणा केली. तर ते एका नेत्याच्या जवळचे आहेत आणि कोर्टात जा असे सुनंदा याना सांगितले. यानंतर त्या कोर्टात गेल्या. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी कलम ४०६, ४०९, ४२०, ४६२, ४६७, ४६८, ४७१, आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा कुंद्रा प्रकरणाशी संबंध नाही. तर, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर अश्लील चित्रपट निर्मिती आणि ऍपच्या माध्यमातून प्रसारण करणे असा आरोप आहे. राज कुंद्राला पोलिसांनी १९ जुलै २०२१ रोजी अटक केली होती. यानंतर न्यायालयाने त्याला दोनदा पोलीस कोठडी दिली.

त्याचा जामीन अर्ज बुधवारी फेटाळण्यात आला. आता राज कुंद्रा १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. या न्यायालयीन कोठडीत कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांची चौकशी सुरु आहे. मात्र शिल्पा अशा कामात सामील असल्याची माहिती अद्याप पोलिसांकडे नाही.