Take a fresh look at your lifestyle.

शिवसेना नेत्याकडून हेमा मालिनीच्या गालांची रस्त्यांसोबत तुलना; अभिनेत्रीने संताप व्यक्त करताच मागितली माफी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्यामुळे जो तो प्रचाराला जोर देताना दिसतोय. अशात शिवसेनेचे नेते पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री पद भूषविणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना डिवचण्यासाठी, माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा भाजपाकडून निषेध करण्यात आला होता. यानंतर आता अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेत संताप व्यक्त केला आहे.

अशा विधानांचा ट्रेंड लालूजींनी वर्षापूर्वी सुरू केला होता आणि अनेकांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या नीट वाटत नाहीत,” असे भाजप खासदार हेमा मालिनी यांनी महाराष्ट्रातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गालावर रस्त्यांची तुलना करताना म्हटले आहे. हेमा मालिनी म्हणाल्या, मी माझ्या गालांची व्यवस्थित काळजी घेते. हरकत नाही ते फक्त विनोद करीत होते. त्यांना काही वाटलं असेल असं काहीतरी. कारण काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड लालू यादव यांच्यापासून सुरु झाला होता. हे खरतर वाईट आहे. तेव्हापासूनच सगळे जण या गोष्टीचा वापर करत आहेत. जो त्यांनी नाही केला पाहिजे. एका लोकप्रतिनिधीने असे वक्तव्य करणे योग्य नाही. हे अतिशय चुकीचे आहे. कारण एखाद्या सामान्य व्यक्तीने असे वक्तव्य करणे एखाद वेळ सोडून देता येते आपण याला काही करू शकत नाही मात्र संसदेशी संबंधित एखाद्या लोकप्रतिनिधीकडून अश्या अपेक्षा नाहीत त्यांनी असे वक्तव्य करणे नक्कीच चुकीचे आहे.

यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी अखेर माफी मागितली आहे. दिलगिरी व्यक्त करीत त्यांनी माझ्या वक्तव्याने भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. मात्र माझा कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दरम्यान इंदोर दौऱ्यावर असताना हेमा मालिनी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले कि, प्रेम आणि आपुलकीचे प्रतिक असलेल्या मथुरेच्या जन्मभूमी तसेच मथुरेच्या खासदार या नात्याने म्हणेन की, येथेही कृष्णाचे भव्य मंदिर असावे. काशी-विश्वनाथचे पुनरुज्जीवन आणि पुनर्विकासाचे परिवर्तन खूप कठीण होते. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते. मथुरेतही तेच होईल, असा विश्वास हेमा मालिनी यांनी व्यक्त केला.