Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मुलगा असावा तर असा..’; शिव ठाकरेने खास पोस्ट शेअर करत वडिलांना दिले ‘हे’ वचन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 1, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shiv Thakre
0
SHARES
1.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वात शिव ठाकरे या नावाचा सॉलिड दबदबा वाढला आहे. रिऍलिटी शो करत करत घराघरात पोहोचलेला शिव ठाकरे- द मराठी माणूस प्रेक्षकांची जान झाला आहे. एमटीव्ही रोडीजमधून प्रकाश झोतात आलेला अमरावतीचा पठ्ठ्या पुढे बिग बॉस मराठी सीजन २ चा विजेता ठरला. यांनतर त्याने हिंदी बिग बॉस सीजन १६ अक्षरशः गाजवलं. यात तो रनरअप होऊनही प्रेक्षकांच्या मनात वसला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

शिवचा अंदाज, स्टाईल आणि वागणं बोलणं प्रेक्षकांना प्रचंड भावलं. त्याची हि घडण त्याच्या आई वडिलांची केली आहे आणि त्यामुळे शिव नेहमीच आपल्या पालकांचा आदर सत्कार करताना दिसतो. यावेळी त्याने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

बिग बॉस हिंदी सीजन १६ संपल्यानंतर आता शिव ठाकरे पुढे काय करणार..? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. अशातच शिव ठाकरे लवकरच खतरों के खिलाडीच्या आगामी सिजनमध्ये दिसणार आहे अशी माहिती समोर आली. एका मुलाखतीत त्याने आपण KKK साठी व्यस्त असणार आहोत असे म्हटले आहे. पण त्याआधी शिवने आपल्या वडिलांना एक वचन दिलं आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक खास पोस्ट शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने इंस्टा स्टोरीवर बाबांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा… मिस्टर ‘मनोहरराव उत्तमराव झिंगूजी गणूजी ठाकरे’ मी तुम्हाला वचन देतो की, तुम्हाला नेहमी माझा अभिमान वाटेल’. शिवची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिव ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचं जबरदस्त फॅनफॉलॉइंग आहे. त्याचे इंस्टाग्रामवर जवळपास २.२ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याच्या या पोस्टला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे.

 

Tags: Bigg Boss FameInstagram StoryShiv ThakareViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group