Take a fresh look at your lifestyle.

अन् शिवाणी चाहत्याला म्हणाली ‘लय होतंय हा आता’…

हॅलो बाॅलिवुड आॅनलाईन | लागिरं झालं जी या मालिकेमधून लोकप्रिय झालेली मराठी अभिनेत्री शिवाणी बावकर नेहमीच आपल्या हटके अदाकारीने चर्चेत असते. शिवाणीने नुकताच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक साडीतला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर अनेकजण कमेंटचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने अशी कमेंट केली की शिवाणी म्हणाली लय होतंय हा आता.

शिवाणीने गुलाबी साडी घातलेला एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला. बॅक टू बेसिक्स असं कॅप्शन या फोटोला शिवाणीने दिले आहे. यावर एका चाहत्याने पाळण्यात बसून घेत होतो झोका, ताईचा फोटो बघून सलमानने दिला ऐश्वर्याला धोका अशी कमेंट केली. यावर शिवाणीने लय झालं हा आता अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, एका चाहत्याने शिवाणीची तुला ज्ञानदाशी करत ज्ञानदा म्हणते उघडा डोळे बघा निट पण तुझा फोटो बघून ज्ञानदालाच आली फिट असं म्हटलं आहे. शिवाणीचा पिंक साडितील लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.