Take a fresh look at your lifestyle.

शिवानी बांवकरच्या ‘लहर’चा कहर सुरु; ‘गुल्हर’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीच्या ‘लागीर झालं जी’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शिवानी बांवकर हि नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. त्यामुळे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल ती सांगताना दिसते. अलीकडेच तिने आपल्या आगामी ‘गुल्हर’ चित्रपटाविषयी सांगितले होते. यानंतर आता या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. ‘गुल्हर’चं मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून सर्वत्र या गाण्याची चर्चा होती. यानंतर अखेर हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे शीर्षक ‘लहर आली’ असे आहे.

मराठी आगामी चित्रपट ‘गुल्हर’मधील ‘लहर आली, लहर आली गं’ या गाण्याने रसिकांना अक्षरशः वेड लावलं आहे. सोशल मीडिया आणि रिल्सवर या गाण्याचा कहर दिसून येतोय. याआधी हे गाणे टिझर स्वरूपात रिलीज झाले होते. यानंतर आता हे संपूर्ण गाणे व्हिडीओसह रिलीज करण्यात आले आहे. ऑडीओप्रमाणेच या गाण्याचा व्हिडीओसुद्धा रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतोय. दरम्यान सुमधूर संगीत आणि कर्णमधुर आवाजाने गाण्याची रंगात वाढवली आहे. तर शिवानी बांवकर आणि रमेश चौधरी यांच्या नव्या कोऱ्या जोडीने गाण्यात चार चांद लावले आहेत. व्हिडीओ पॅलेसने हे गाणे रसिकांपर्यंत पोहोचवले आहे.

आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली निर्माते शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी ‘गुल्हर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर ‘गुल्हर’चे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी स्वतःच चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शिवानी बांवकर आणि रमेश चौधरी पहिल्यांदाच एकत्र मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना शिवानी आणि रमेश या नव्या जोडीची केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा 11 वर्षांच्या मुलाभोवती फिरते. तरीही यात एका प्रेमी युगुलाच्या लव्ह स्टोरीचा अँगल दिला आहे. हे अनोखं रसायन अनुभवण्यासाठी हा चित्रपट जरूर पहा.

या चित्रपटात शिवानी- रमेशसोबत रवी काळे, भार्गवी चिरमुले, विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्नील लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ, गणेश शितोळे आदि कलाकारांनी अन्य मुख्य भूमिकेसाठी अभिनय केला आहे.