Take a fresh look at your lifestyle.

शिवानी सुर्वेची बिग बॉसच्या घरात पुन्हा होणार ‘एन्ट्री’ !

0

मुंबई : अभिनेत्री शिवानी सुर्वे मराठी बिग बॉसच्या घरात पुन्हा परतणार असल्याची माहिती समोर आली आहे . बिग बॉसशी वाद घातल्यानंतर शिवानीला घराबाहेर काढण्यात आलं होतं.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता प्रकृतीत सुधार झाल्यानंतर शिवानीने बिग बॉसच्या घरात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवानी उद्या बिग बॉसच्या घरात परतणार आहे. मात्र याला चॅनलकडून अधिकृत दुजोरा अद्यापही दिलेला नाही.

शिवानी सुर्वे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. शिवानी, अभिजित बिचुकले आणि पराग कान्हेरे या स्पर्धकांना काही कारणांसाठी बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आले होते. परंतु येत्या विकेन्डच्या डावात शिवानी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात येईल असे सांगण्यात येत आहे.

माझी प्रकृती बरी नसल्याने घराच्या बाहेर पडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी घरात जाण्याच्याआधीच माझ्या हेल्थ प्रोब्लेमविषयी बिग बॉस मराठीच्या टीमला कल्पना दिली होती आणि ते देखील मी घरात असताना जमेल तितकी मला मदत करत होते. पण घरात घडलेल्या काही घटनांमुळे मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे माझी तब्येत अधिक बिघडत होती. मात्र आता मी बरी झाले असून जर मला बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच जाणार ,अशी प्रतिक्रिया एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवानीने दिली होती .

Leave a Reply

%d bloggers like this: