Take a fresh look at your lifestyle.

जागा आणि वेळ तुम्ही सांगा मी तिथे येते ; उर्मिला मातोंडकरांचे कंगनाला खुलं आव्हान

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि उर्मिला मातोंडकर नेहमीच एकमेकींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतच शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी नवीन कार्यालय खरेदी केले आहे. त्यांनी तीन कोटींचे नवीन कार्यालय घेतल्यानंतर कंगना रनौतने तिच्या नवीन ऑफिसला लक्ष्य केले आहे. भाजपला पाठिंबा देऊन माझा काही उपयोग नाही, पण कॉंग्रेसमुळे उर्मिलाला खूप फायदा झाला आहे.असा उपरोधिक टोला कंगणाने लगावला होता. दरम्यान उर्मिला मातोंडकर यांनी कंगणाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

उर्मिला यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओ मध्ये उर्मिला म्हणाल्या, ‘नमस्कार कंगना जी…माझ्याबद्दचे तुमचे म्हणणे मी ऐकले आहे. मीच काय तर पूर्ण देशानी देखील ऐकलं आहे. आज पूर्ण देशासमोर मी तुम्हाला सांगू इच्छिते, जागा आणि वेळ तुम्ही सांगा मी माझे सगळे कागदपत्र तेथे घेऊन येते. त्याच्या बदल्यात मला फक्त जे तुम्हाला सरकारने लोकांच्या पैशातून ‘वाय प्लस’ सेक्युरिटी दिली होती. ज्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना वचन दिले होते कि, तुमच्याकडे एनसीबीला देण्यासाठी लिस्ट आहे. ती फक्त येताना घेऊन याला तुमच्या उत्तराची मी वाट बगत आहे जय हिंद जय महाराष्ट्र.’ असा व्हिडिओ मातोंडकर यांनी पोस्ट केला आहे.

नक्की काय म्हणाली होती कंगना –

भाजपला पाठिंबा देऊन माझा काही उपयोग नाही, पण कॉंग्रेसमुळे उर्मिलाला खूप फायदा झाला आहे. ‘उर्मिला जी मी स्वत: च्या मेहनतीने घरे बांधली होती, कॉंग्रेस त्यांना तोडत आहे. भाजपाला खुश करण्यासाठी माझ्यावर फक्त २०-२५ केस आहेत. माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या इतकी हुशार असते आणि कॉंग्रेस सोबत आले असते. खरच मी मूर्ख आहे. असा टोला कंगनाने उर्मिलाला लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.