Take a fresh look at your lifestyle.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी ऐकून चाहती गेली कोमात; खुद्द डॉक्टरांनीच ट्विटरवर दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस’ १३ चा विजेता आणि मालिका इंडस्ट्री गाजवणारा अभिनेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हि बातमी पसरल्यानंतर टीव्ही इंडस्ट्री व त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या चाहत्यांना अद्यापही तो नसण्याचा धक्का सहन होत नाहीये.

अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने अकाली एक्झिट घेणे त्याच्या कुटुंबियांसह त्याच्या चाहत्यांसाठी असहनीय घटना आहे. अश्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची एक चाहती कोमात गेली आहे आणि याबाबतची माहिती खुद्द डॉक्टरने ट्विट करून दिली आहे.

डॉ. जयेश ठकेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थची एक चाहती त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून बाथरूममध्येच बेशुद्ध पडली आणि अश्या अवस्थेत ती सापडली होती. यानंतर डॉक्टरने ट्विटमध्ये चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांने या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे आणि यासोबत लिहिले कि, “मित्रांनो, तुमच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी बोला, एकटे राहू नका, सिद्धार्थच्या एका फॅनला काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं, कारण ती वॉशरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली… कृपया स्वतःची काळजी घ्या… तिच्यासाठी प्रार्थना करा” असं म्हटलं आहे.

तर अन्य एका ट्विटमध्ये डॉक्टरांनी लिहिले कि, “जास्त ताणामुळे माणूस असा अंशत: कोमात जाऊ शकतो. मला वाटतं प्रत्येक चाहत्याने आता सावरायला हवं. शांत व्हा, झालेल्या घटनेचा जास्त विचार करणं थांबवावं आणि तुमचं मन विचलित होऊ देऊ नये. हे सोपं नाही, हे मला माहीत आहे. पण स्वतःला जपा”. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबत ट्विट करताना लिहिले आहे कि, पोलिसांकडून सिद्धार्थच्या मृत्युची चौकशी सुरू आहे. सध्या त्याचे निकटवर्तीय आणि जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. त्यानुसार, सिद्धार्थच्या आईचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यामध्ये रात्रीपर्यंत सिद्धार्थ ठीक होता. मात्र रात्री जेवणानंतर तो झोपला ते सकाळी तो उठलाच नाही, अशी नोंद आहे. शिवाय सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या जिम ट्रेनरने तो कुठल्याही मानसिक तणावात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.