Take a fresh look at your lifestyle.

अजय देवगणच्या ‘या’ चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार सुरू

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेते अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या आगामी ‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या चित्रीकरणाच्या सेटवर शूटिंग करताना अधिक काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी काही नियमही आखून दिले गेले आहेत.

सेटवर कशा प्रकारे, कोणती काळजी घेता येईल यासाठी अजयची संपूर्ण टीम एक योजना सध्या तयार करतेय. त्यानुसार चित्रीकरणाच्या वेळापत्रकाची आखणी करण्यात येतेय. येत्या सप्टेंबरमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा विनोदी सिनेमा सॉर्ते कुगलर या डॅनिश चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या कित्येक वर्षांपासून इंद्रकुमार या प्रकल्पाची पटकथा लिहित आहेत. खरं तर या चित्रपटाचं चित्रीकरण 10 एप्रिलपासून सुरू होणार होतं. पण, सध्या सुरू असलेल्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रीकरण रखडलं होतं.आता नव्या नियमांसह कशा प्रकारे चित्रीकरण सुरू होईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Comments are closed.