Take a fresh look at your lifestyle.

राजू, श्याम आणि बाबूराव लवकरच येणार आपल्या भेटीला; ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाची शूटिंग होणार सुरु

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेरा फेरी या मनोरंजक चित्रपटाची सिरीज इतकी लोकप्रिय आहे कि येणाऱ्या आगामी सिरीज ची माहिती येताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. ‘हेरा फेरी ३’ ची प्रतीक्षा करणार्‍या चाहत्यांसाठी हि मोठी बातमी आहे. राजू, श्याम आणि बाबूराव पुन्हा एकदा धमाल करायला आणि हसवायला येत आहेत. ‘हेरा फेरी’ या चित्रपटाला तब्बल २१ वर्षे पूर्ण झाली असून, निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी ‘हेरा फेरी 3’ बद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

‘पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी सांगितलं की, ते लवकरच अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या सह ‘हेरा फेरी ३’ सिनेमावर काम सुरू करणार आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, फक्त ‘हेरा फेरी ३’ नाही तर इतर सिनेमांचादेखील या सत्रात समावेश करणार आहेत. ज्याचे नाव ‘हेरा-फेरी’ या चित्रपटावर आधारित असेल.

निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी चित्रपटाबाबत अधिक माहिती देताना सांगितलं, या चित्रपटात ‘हेरा फेरी २’ च्या समाप्तीच्या सिनचेही उत्तर मिळणार आहे. म्हणजेच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात दुसऱ्या भागातील स्टोरी पुढे सरकताना दिसणार आहे. ‘हेरा फेरी’ मध्ये अक्षय, सुनील आणि परेश याच्या व्यतिरिक्त तब्बू आणि ओम पुरी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे आताच्या सीजन ३ मध्ये कोणकोणते कलाकार दिसणार याबाबत जोरदार चर्चा रंगात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.